आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारायण राणे म्हणजे शेपूट तुटलेला लांडगा, रामदास कदम यांचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘नारायणराणे यांना आम्ही किंमत देत नाहीत. त्यांचा फणा आम्ही केव्हाच ठेचला आहे. ते शेपूट तुटलेला लांडगा असून त्यांना काहीच बोलायचा अधिकार नाही’, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते, आमदार रामदास कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी महासंघाच्या वतीने देण्यात येणारा अकरावा राष्ट्रसंत तनपुरेबाबा राज्यस्तरीय मराठी भूषण पुरस्कार कदम यांना एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणेंना लोकसभेत त्यांना आपला मुलगा निवडून आणता आला नाही. शेपटी तुटलेल्या लांडग्यासारखी त्यांची अवस्था झाल्याचे कदम म्हणाले.
गप्पा मारून समाज सुधारत नाही...
दहा वर्षांपासून राष्ट्रसंत तनपुरेबाबा राज्यस्तरीय मराठी भूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी राज्यातून २२ प्रस्ताव आले होते. पुरस्कार देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आमदार रामदास कदम यांची निवड केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गप्पा मारून समाज सुधारत नाही. त्यासाठी काही तरी करावे लागते हे त्यांनी दाखवून दिले असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक संभाजी दहातोंडे म्हणाले.

पुढील स्लाइडवर वाचा, कदम म्हणाले, बाळासाहेब नसले तर हिंदू संपला असता