आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीनाताईंसारखाच पाहुणचार करतात बाळासाहेबांच्या धाकट्या सुनबाई रश्मी ठाकरे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच चढउतार पाहण्यास मिळत आहेत. जो तो प्रचार करण्यात गुंग़ झाल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे. पण राजकारण्यांच्या पडद्यामागच्या आयुष्यावर नजर टाकल्यास आपल्याला समजेल की, त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीमागे किती भक्क्मपणे उभे आहे. रश्मी ठाकरे यांचे लग्न 13 डिसेंबर 1988 रोजी झाले. माझे लग्न ठरले त्यावेळी माझ्या मनात बाळासाहेबांच्या विषयी आदरयुक्त भिती होती पण, आई मीनाताई आणि उद्धव ठाकरे यांनी मला घरामध्ये रुळायला मदत केली. जशा मीनाताई प्रेमाने शिवसैनिकांचे स्वागत करायच्या त्याच पद्धतीने रश्मी ठाकरे देखील आलेल्या कार्यकर्त्यांचा पाहूणचार करतात हे विशेष.
2010 मध्ये कल्याण-डोंबीवली येथील महापालिकेच्या निवडणूक प्रचारातही रश्मी ठाकरेंनी प्रचाराची धूरा संभाळली होती. त्यावेळी दोघी जावा-जावा (रश्मी उद्धव ठाकरे आणि शर्मीला राज ठाकरे) प्रचारासाठी एकमेकींच्या समोरा समोर आल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सेनेच्या 18 विजयी खासदारासोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. नुकतेच त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे सहकुटुंब दर्शन घेतले यावेळी त्यांनी राज्यात शिवशाहीचे सरकार येऊ देत असे साकडे घातले.
पुढील स्लाइडवर पाहा, रश्मी ठाकरे यांची निवडक छायाचित्रे...