आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rashtravadi Congress Candidate Submit Nomination Form News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे सोपल, शिंदे, बागल शुक्रवारी दाखल करणार अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पालकमंत्री दिलीप सोपल (बार्शी), आमदार बबनराव शिंदे (माढा), रश्मी बागल (करमाळा) हे तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाकडून त्यांना स्पष्ट आदेश मिळाले आहेत. मात्र, मोहोळ माळशिरस मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. यास जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी दुजोरा दिला आहे.

सोपल, शिंदे, बागल यांची उमेदवारी नक्की आहे. तर प्रा. लक्ष्मणराव ढोबळे (मोहोळ) हनुमंत डोळस (माळशिरस) यांची उमेदवारी नक्की झालेली नाही.
ढोबळेयांचा पत्ता कट?
अनुसूचितजातीसाठी राखीव असलेल्या मोहोळमधून ढोबळे यांचा पत्ता कट होणे नक्की असल्याचे कळते. त्यांच्या ऐवजी अर्जुन वाघमारे, रमेश कदम राम जगदाळे यांची नावे आघाडीवर आहेत. तर माळशिरस मतदारसंघासाठी डोळस यांच्याऐवजी अन्य नावांची चर्चा सुरू असून ती नावे मात्र, समजू शकली नाहीत. गुरुवारी सायंकाळपर्यंत नाव कळेल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
अद्याप कोणाचे नाव नाही
"पक्षानेअधिकृत कोणाचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी भाजपकडून अधिकृत अर्ज दाखल होणार नाही.” शहाजीपवार, जिल्हाध्यक्ष,भाजप
आघाडी झाल्यास इतर जागांचा विचार आघाडीविषयी प्रदेशपातळीवर चर्चा सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आघाडीसंबंधी निर्णय झाल्यास इतर जागांवर उमेदवार उभे करण्याविषयी विचार होईल. प्रदेशस्तरावर जो आदेश येईल, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येणार आहे.” मनोहरडोंगरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर