आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंगण - बिभीषण अन् हनुमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युतीचे आघाडीचे बारा वाजले. एका रात्रीत अनेकांनी कोलांटउड्या मारण्याचा विक्रम करत अापण किती लाचार होऊ याची ग्वाही पक्षश्रेष्ठींना दिली. यमुनेची राणी झालेल्या कमळाबाईंच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. राज्यावर लक्ष असलेल्या भाऊंचे (पक्षी : रा. रा. नितीन भौ नागपूरकर) दूत २४ बाय भाऊंना अपडेट देत आहेत.
खड्डे पडलेल्या रस्त्यावरून राज्यभर सभेसाठी फिरावे लागणार म्हणून भाऊंच्या जिवावर आले आहे. कोणत्या रस्त्यावर किती खड्डे याचे मोजमाप ते सभांसाठी गावोगावी जाताना आपल्या मोबाइलवर करताहेत, तेवढ्यात भाऊंचा फोन खणखणला ...

'बोल बे भैताड्या, मी कवाचा वाट पाहून राहिलो फोनची.'
'भौ, तुमालेच फोन लावीत होतो, पर लाइनच एंगेज येत व्हती.'
'मुद्द्याचं बाेल बे, आज खायाले काय हाय बे.'
'काय भौ?'
'तुला नाय बे, तू बोल.'
'भौ, ते चतुरदादा देवेंद्रभाऊ तं सारं रामायणच सांगून राहिले नं.'
'तुमी तं लेकाहो, दुसऱ्याचंच सांगून राहिले, माह्यावाल्या भाषणाचं बोलं ना बे, अबे हे वडे कोठून आणले बे.'
'काय भौ?'
'तुला नाय बे... तू बोल.'
'भौ, तुमचा त्यो व्हायरसचा मुद्दा लय आवडून राहिले लोकास्नी.'
'मग बे भैताड्या, दिल्लीत बसूनसनी म्या सवत: तो व्हायरस शोधला हाय, मजाक नाय.'
'पर भौ, त्ये व्हाॅट्सअॅपवर लय मेसेज फिरून राह्यलेती.'
'कसले बे ..'
'गुजराती - मराठी असा वाद केल्याय त्यात म्हणं.'
एक वडा तोंडात असल्याने भाऊंना जरा ठसका लागला. त्यांनी पाणी पिले अन् पुन्हा मोबाइलवर बोलायला सुरुवात केली.
'कोन रे त्यो भैताड्या, असले मेसेज पाठवतोय, शोधा की बे त्यास्नी'
'बरं बरं ठेवतू भौ.'
मेसेजचं ऐकल्यापासून भाऊंचा जीव वरखाली होऊ लागला. त्यांचं वडा खाण्यावरनं मन उडालं. त्यांनी चतुर फडणीसांना फोन लावला व्हाॅट्सअॅपवरच्या मेसेजची माहिती दिली.
'भौ, फार काळजी करू नये, आम्ही नाथाभाऊंच्या संगतीने योग्य तो बंदोबस्त करू त्याचा.'
मग भाऊंच्या जिवात जीव आला. त्यांनी मोठ्या उत्साहाने सहावा वडा तोंडाला लावला फडणीसांना म्हणाले,
'का बे, ते बिभीषणाचं काय प्रकरण हाय? नुसत्या बिभीषणानं काय होणार हाय? एखादे हनुमान शोधा म्हणजी मग काळजी नकू लंकादहनाची. परवाच्या दसऱ्याला.'
चतुर फडणीसांनी डोक्यावर हात मारत फोन खाली ठेवला.