आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: प्लॅनिंगची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रा. रा. संपत साहेबांनी ऐन पितृपक्षात निवडणुकांची घोषणा केली आणि तेव्हापासून उठलेला प्रचाराचा धडाका एकदाचा थांबला. या १५ दिवसांतच बरेच पाणी पुलाखालून वाहिले. जे २५ वर्षांत झाले नाही ते १५ दिवसांत झाले. युतीचा काडीमोड आणि आघाडीचा घटस्फोट झाला. स्वबळाच्या बेटकुळ्या २८८ मतदारसंघांत घुमू लागल्या. प्रचाराच्या रणधुमाळीत ढाण्या वाघ, बेडूक, लांडगा, कोल्हा आदी प्राण्यांना विशेष त्रास सहन करावा लागला. आता जनमत चाचण्यांनी एकच गोंधळ उडवून दिला आहे. कमळाने शतक ठोकून सर्वांवर बाजी मारल्याने सर्वच पक्ष धास्तावले आहेत. प्रत्येक पक्षात या आकड्यांवरून पुढचे प्लॅनिंग ठरते आहे.
***
धरणमित्र दादा आपल्या सर्व सहका-यांसह मस्त गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात फायली बगलेत मारलेली पुलोदस्वामी काकांची स्वारी तेथे दाखल झाली. ‘काय दादा, काय म्हणतो आकडा?’ त्यांनी दादांना विचारले. ‘काय कळतंय वो यांनाए काही ठोकून देतात लेकाचे या ठिकाणी’ दादांनी त्राग्याने उत्तर दिले. ‘अहो दादा, अशा वेळी थंड डोक्याने काम करावे. याही आकड्यात आपल्याला काय संधी आहेत, हे शोधणे महत्त्वाचे.’ काकांच्या कानपिळणीने दादा हिरमुसले, ‘तसं घाबरायचे काही कारण नाही, मी दिल्लीत बोललोय कमळाचार्यांना ऐनवेळी काय करायचे ते, सेनेचे आणि आपले संबंध तर बाळासाहेबांपासून मैत्रीचे आहेत.’ काकांच्या प्लॅनिंगने घड्याळ्याच्या गोटात वेगळाच उत्साह भरला...
पुढे वाचा... बाबांविषयी