आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंगण - ‘सीएम’ पदाचे डोहाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पितृपक्ष संपला. राज्यात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. घटस्थापनेच्या दिवशी सर्वच पक्षांच्या मनासारखे झाले. प्रत्येकाने आपले घट वेगळे बसवले. त्यामुळे त्या त्या पक्षातील दिग्गजांचा सीएम पदाचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षांपासून वर्षावर डोळा असणाऱ्यांच्या मनात आशेचा वर्षाव होऊ लागला...
दिवसभर उमेदवारी अर्ज भरण्याच्या धावपळीने थकले-भागले धरणमित्र दादा घरी आले. प्रशस्त सोफ्यावर पाय पसरून बसलेल्या दादाला लगेच छान झोप लागली...... दादांनी टीव्ही आॅन केला, तर सर्वच चॅनलवर निकालाच्या बातम्या झळकत होत्या, राष्ट्रवादीचे घड्याळ बहुमतात येण्याचे कल होते. दादा एकदम खुश झाले. त्यांनी पटापट फोन करायला सुरुवात केली, सीएमपदाच्या शपथविधीला कोणते कपडे घालायचे, कसे बोलायचे, भाषणात ‘त्या ठिकाणी’ किती वेळा वापरायचे, हातकरांना कसे टोले हाणायचे याचे सल्ले ते घेऊ लागले.. मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... असे शब्द त्यांच्या कानात घुमायला लागले... तेवढ्यात वहिनींनी त्यांना जागे करत विचारले.. कसली शपथ.. काय झाले... मग धरणमित्र दादा भानावर आले.. धड स्वप्नदेखील पाहू देत नाहीत, याठिकाणी, असे म्हणत... त्यांनी आळस झटकला.
घड्याळवालांशी फारकत घेतल्यापासून कोकणभूषण राणेदादांचे दोन दिवस खूपच धावपळीत गेले. हाताची धुरा त्यांच्याकडे असल्याने जबाबदारी वाढली होती. त्यातच घड्याळाचे अनेक काटे सीएमपदाच्या मार्गातून दूर झाल्याने राणेदादांना गुदगुल्या होत होत्या. तिकीट वाटप, याद्या तयार करणे, त्यावरून वारंवार नजर मारणे आदी कामे आटोपून राणेदादा घरी आले. एसीच्या थंड झुळुकांनी निद्रादेवीने त्यांचा ताबा घेतला..... राणेदादांची कोकणी तोफ तुफान गर्दी खेचत होती, हाताच्या सभेला झुंडीच्या झुंडी येत होत्या, आता निकालात हात बाजी मारणार असे चित्र होते. राणेदादा खुश होते, नऊ -दहा वर्षांपासून हुलकावणी देणार्‍या सीएमच्या खुर्चीवर ते विराजमान झाले होते. आता मुलाच्या पराभवाचा कसा बदला घ्यायचा याचा मास्टरप्लॅन तयार होता. राडा झालाच पाहिजे तरच स्वाभिमान टिकेल असे राणेदादांनी ठरवले होते... तेवढ्यात फोन खणखणला... त्याच्या आवाजाने राणेदादांची तंद्री भंगली... मॅडम फोनवर विचारत होत्या... काय म्हणतोय प्रचार.. नुसत्या झोपा काढू नका.. नाहीतर हाती काहीच लागायचे नाही.. राणेदादांना पूर्ण जाग आली... त्यांनी आळस झटकला.