(लातूरमध्ये आई आदिती देशमुख सोबत अवीर)
लातूर - विविध पक्षांच्या उमेदवारांना निवडणूकीत जिंकवून देण्यासाठी त्यांचे कुटुंबियही आता सरसावले आहेत. लातूर मतदार संघातही काहीसे असेच चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख यावेळी लातूरमधून निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. अमित यांच्या प्रचारासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच त्यांची पत्नी आणि मुलानेही प्रचारसभेत हजेरी लावली आहे. तसेच अमित यांचे लहान भाऊ बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि धीरज यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे.
रितेश देशमुखचा मोठा भाऊ
अमित देशमुख हे बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचे मोठे भाऊ आहेत. रितेशसुध्दा
आपल्या भावाचा प्रचार करण्यासाठी सध्या लातूरमध्येच आहे. यापूर्वी लातूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे नेते स्व. विलासराव देशमुख हे निवडणूक लढत होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अमित येथून निवडणूक लढवत आहे.
मंत्रीपद देण्यात आले आहे
अमित देशमुख यांना नुकतेच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी तुटल्याने त्यांचे हे मंत्रीपद गेले आहे. आमदार होण्यापूर्वी अमित काँग्रेस यूथ विंगचे कार्यकर्ता होते, त्यानंतर त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, अमित देशमुख यांच्या लातूरमधील प्रचाराचे फोटो...