आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवलेंच्या रिपाइंत फूट; अर्जुन डांगळेंना आपल्या गोटात ओढण्यात शिवसेनेला यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊनही रिपाइं नेते रामदास आठवलेंनी भाजपसोबतच जाण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे शिवसेनेने आठवलेंचे निकटवर्तीय अर्जुन डांगळे यांना आपल्या गोटात ओढून आठवले गटातच फूट पाडली.
रिपाइंच्या दोन उमेदवारांना पाठिंब्याचे आश्वासन देत शिवसेनेने डांगळे यांना गळाला लावले असले तरी ते हे आश्वासन कितपत पाळतात याविषयी मात्र शंका आहे. महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाचे आश्वासन मिळाल्याने आठवले यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दलित मते दुरावण्याचा धोका ओळखून शिवसेना नेत्यांनी आठवले यांचे निकटवर्तीय, आंबेडकरी चळवळीतील बुद्धिजीवी कार्यकर्ते, कवी अर्जुन डांगळे यांना आपल्या गोटात ओढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
'भाजपसोबत जाण्यास रिपाइं पदाधकिाऱ्यांचा विरोध होता. मात्र भाजप नेत्यांनी दबाव टाकत आठवलेंना भाजपसोबत येण्यास भाग पाडले. मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. भीमशक्ती केवळ शिवशक्तीच्या मागे उभी केली. बाळासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी मी शिवशक्तीबरोबर आलो आहे,' असे डांगळे यांनी पत्रकारांना सांगितले.

दोन उमेदवारांना पाठिंब्याचे आश्वासन

फसवे आश्वासन
शिवसेनारिपाइंला सत्तेत वाटा देईल तसेच त्यांच्या चेंबूर आणि कळवा येथील उमेदवाराला पाठिंबा देईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी डांगळे यांना दिले. असे असले तरी या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने चेंबूर येथून प्रकाश फातर्फेकर आणि कळवा-मुंब्रा येथे दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली आहे.'या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना उमेदवारी मागे घेणार का?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता डांगळे यांनी होकारार्थी उत्तर देत 'शिवसेना रिपाइंलाच मदत करेल,' असा विश्वासही व्यक्त केला. परंतु शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने मात्र आमचे उमेदवार कदापिही माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
डांगळेंची घुसमट
डांगळेरिपाइंचे प्रवक्ते होते. अलकिडेच पक्षात आलेले उत्तम खोब्रागडे, पी. के. जैन अशा निवृत्त अधकिाऱ्यांची सद्दी होती. त्यामुळे डांगळे अडगळीत पडले होते.
साहित्यिक नेता
डांगळे साहित्यिक आहेत. "छावणी हलते आहे', "दलित विद्रोह' आदी कवितासंग्रह प्रसिद्ध. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात अग्रभागी. आधी प्रकाश आंबेडकरांशी नंतर आठवलेंशी जवळीक.