आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RR Patil\'s Shocker: Accused Candidate Should Have Raped After Polls

आबा पुन्हा घसरले, म्हणाले- ‘बलात्कारच करायचा होता, तर थोडे थांबायचे होते’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात असतानाच सभ्य स्वच्छ नेत्याची छबी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तोल गेला. आपल्याच तासगाव मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराने ‘निवडणूक होईपर्यंत तरी बलात्कार करायला नको होता’ असे म्हणत आर.आर. यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
मनसे उमेदवार सुधाकर खाडे यास बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्यावरून कवठे एकंद येथील सभेत पाटील म्हणाले, ‘मनसे कार्यकर्त्यांनी भेटून तुम्हाला पाठिंबा असल्याचे सांगितले. कारण विचारले तर ते म्हणाले, ‘आमचा उमेदवार तुरुंगात आहे.’ त्याने काय पुण्यकर्म केले असे विचारले तेव्हा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या उमेदवाराला आमदारच व्हायचे होते तर निवडणुकीपर्यंत तरी थांबायचे होते.’

गुन्हा दाखल करा
पाटीलयांनी गुन्ह्याला प्रोत्साहन दिले आहे. जा आणि महिलांवर बलात्कार करा अशी चिथावणी त्यांनी दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या १०७ कलमान्वये गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी केली.

आबा आणि वादग्रस्त वक्तव्य
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी आबांनी ‘पाच हजार लोकांना मारण्याची अतिरेक्यांची योजना होती. आम्ही कितीतरी कमी लोक मरू दिले. मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात,’ असे विधान केले होते. त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपदही गमवावे लागले होते.
विधानावरून वादंग निर्माण होताच आर. आर. पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण गमतीने असे बोललो होतो. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.
मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांना आधीही बलात्काराच्या गुन्ह्यात गोवले होते. ते निर्दोष सुटले. आता माघार घेत नाही, म्हणून पाटलांनी त्यांना बलात्काराच्या दुसऱ्या गुन्ह्यात अडकवले. त्यांच्या पत्नीलाही अॅट्रा सिटीखाली गोवले. सत्तेचा गैरवापर करून घाणेरडे राजकारण हाच त्यांचा ‘स्वच्छ चेहरा’ आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील सभेत केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, आर आर पाटील यांचे धक्कादायक वक्तव्य...