आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RSS Will Not Support BJP After Alience Breakup With ShivSena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या मदतीला संघ धावणार नाही; युतीतील फुटीवर संघाची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील शिवसेना-भाजपची युती अभेद्य राहावी, अशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची अपेक्षा होती. मात्र, अचानक ओढावलेल्या राजकीय परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत संघाची कोणतीच भूमिका तयार नाही. यामुळे नैसर्गिक भूकंप असो वा राजकीय, स्वयंसेवक हे राष्ट्रहित जपणारी आणि लोकशाहीला बळकट करणारी भूमिकाच घेतील. या राजकीय पेचप्रसंगात भाजपच्या मदतीला धावून जाणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

शिवसेना-भाजपमधील २५ वर्षांच्या काडीमोडी ही दुर्दैवी असल्याचे सांगतानाच संघाला ही अपेक्षा नव्हती, असे मत ज्येष्ठ स्वयंसेवकांनी व्यक्त केले. राज्यातील २८८ जागांवर उमेदवार मिळवतांना भाजपची दमछाक होणार आहे. त्यामुळे शाखांच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेला संघ आता भाजपच्या मदतीला येईल, अशीच सर्वांची अपेक्षा होती. भाजपलाही तसेच वाटत होते; परंतु संघाने कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी नकार दिला आहे.

संघदक्ष, पण सक्रिय नाही : आणीबाणी किंवा आताच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे होते. राष्ट्रहित लक्षात घेऊन संघ प्रत्यक्ष प्रचारात उतरला होता; परंतु आता देश जिंकून दिल्यावर राज्यातील विजय भाजपने स्वबळावर मिळवावा. उठसुट मोठ्या भावाची मदत घेऊ नये, असे स्पष्ट संकेत संघाने यापूर्वीच दिले आहेत. संघ आजही याच भूमिकेवर ठाम आहे. कितीही संकटे आली, तरी स्वयंसेवकांकडे देशहित आणि लोकशाही बळकट भूमिका घेण्याची जाण आहे. यासाठी संघ मुख्यालयातून वेगळी सूचना येण्याची वाट बघणे आवश्यक नसल्याचे संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रचारक वामनराव देशपांडे यांनी स्पष्ट केले. संघ दक्ष राहील पण सक्रिय राहणार नाही. भाजपच्या मदतीसाठी धाव घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लुडबुड नाहीच
- एखाद्यातत्कालिक वा राजकीय हितासाठी संघ कधीच काम करत नाही. रोज येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची व्यक्तिशुद्ध भूमिका स्वयंसेवक घेत असतात. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीला कसे हाताळायचे, हे स्वयंसेवकच ठरवतील. भाजपच्या कारभारात संघ लुडबूड करणार नाही. दिलीपधारूरकर, ज्येष्ठपत्रकार संघ विचारांचे अभ्यासक
‘शिवसेनेचाच आडमुठेपणा’
शिवसेनेच्यासध्याच्या नेतृत्वाचा आठमुठेपणा आणि अहंकार युती तुटण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे जे झाले ते योग्यच झाले, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

युती झाली तेव्हा शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडे होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही फारसा बाऊ करता त्या वेळी शिवसेनेच्या नेतृत्वाशी जुळवून घेण्याचाच प्रयत्न केला. मात्र, आता तशी परिस्थिती आहे काय? हे शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाने लक्षात घेणे आवश्यक होते. उद्धव ठाकरे हे काही बाळासाहेब नाहीत. त्यामुळे त्यांचा आडमुठेपणा भाजपने खपवून घेण्याचा प्रश्नच नव्हता’, याकडे संघाच्या या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले.