आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Has Announced State Poll Candidate News In Marathi

"समाजवादी'ला काँग्रेसबरोबर आघाडीची आशा, ए, बी फॉर्म राखून उमेदवारांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेला मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास इच्छुक आहे. मात्र, आघाडीच्या जागावाटपाचे घोंगडे अडकल्यामुळे आघाडीस उतावीळ झालेल्या समाजवादी पक्षाने उमेदवाराविनाच राज्यातील आपल्या मतदारसंघाची घोषणा करून दुधाची तहान ताकावर भागवली आहे.

समाजवादी पक्षाने गेल्या विधानसभेला "रिडालोस'मधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये भिवंडी -पूर्व, भिवंडी -पश्चिम, मानखुर्द आणि नंदुरबार या मतदारसंघांतून चार जागी समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. या वेळी मात्र "एमआयएम'च्या राज्यातील प्रवेशाने समाजवादी चांगलीच हादरली आहे. त्यामुळे समाजवादीचे राज्यातील सर्वेसर्वा आमदार अबू असीम आझमी काँग्रेस-राष्ट्रवादीशी तडजोड करत आघाडी करण्यास अतिइच्छुक आहेत.

वाट पाहून थकलेल्या समाजवादी पक्षाने विधानसभेसाठी मतदारसंघाच्या दोन याद्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यात केवळ मतदारसंघांचीच नावे आहेत. या मतदारसंघांमधून कोणास उमेदवारी दिली आहे, त्यांची नावेच या याद्यांमध्ये नाहीत. समाजवादी पक्षाने केवळ मतदारसंघ जाहीर केलेले आहेत. पक्षाने अद्याप एकाही इच्छुक उमेदवारास "ए' किंवा "बी' फॉर्म दिला नसल्याचेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नावाची घोषणा झालेल्या उमेदवारांच्या गोटातही घबराटीचे वातावरण न‍िर्माण झाले आहे.

हे आहेत मतदारसंघ दिंडोशी, बांद्रे, कालिना, भायखळा, चारकोप, दहिसर, नागाठाणे, भांडूप, कांदिवली, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोट, परतूर, नागपूर (पूर्व), मूर्तिजापूर, धुळे, मालेगाव, नवापूर, एरंडोल, रावेर, जळगाव (शहर), उदगीर, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, कुर्ला, बांद्रे (पूर्व), मुंबादेवी, वर्सोवा, भिवंडी (पूर्व), भिवंडी (पश्चिम), मानखुर्द-शिवाजीनगर, विक्रोळी, मुंब्रा-कलवा या मतदारसंघांत समाजवादी उमेदवार उभे करण्यास इच्छुक आहे.