आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे मंत्री संजय सावकारे भाजपमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभानिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के देण्याची भाजपची मोहीम सुरूच आहे. सोमवारी राज्यमंत्री संजय सावकारे, आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचे स्वागत केले.
भुसावळ या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघाचे संजय सावकारे आमदार आहेत, तर कथोरे हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीत असतानाही सावकारे हे खडसेंच्या जवळचे मानले जायचे. मतदारसंघ राखीव झाल्याने माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपले स्वीय सहायक असलेल्या आमदारकीची संधी िदली. पहिल्यांदाच आमदार होऊनही त्यांना मंत्रिपदाची लॉरीही लागली होती.
दुसरीकडे, निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याने कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कथोरेंना भाजप घेणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही डॉ. विजयकुमार गावित यांच्याप्रमाणे भाजपने कथोरेंनाही प्रवेश दिला. पक्षात अलीकडेच झालेल्या संघटनात्मक नेमणुकांच्या वेळेस मला विश्वासात घेण्यात आले नाही. माझ्या कार्यकर्त्यांना ही महत्त्व देण्यात नव्हते. त्यामुळे माझ्यावर कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशासाठी दबाव होता, असे सावकारे यांनी सांगितले.