आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharasd Pawar And Ajit Pawar Attack On Ex CM Prithviraj Chavan

शेवटच्या सहा महिन्यातील मंजूर फायलींची चौकशी गरजेची, दोन्ही पवारांची चव्हाणांवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/औरंगाबाद- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाताजाता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित संचिन घोटाळ्याच्या चौकशीला मंजूरी दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस चव्हाणांना टार्गेट करत आहे. आघाडी सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात झालेल्या फायलींची चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तर, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर भाजप सोबतच्या युतीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या रडारवर सध्या पृथ्वीराज चव्हाण आहेत. काँग्रेसच्या जाहीरातींवर प्रश्न उपस्थित करताना अजित पवार म्हणाले, 'नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जेवढी जाहीरातबाजी केली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने विधानसभा निवडणुकीत केली जात आहे. मराठीतील कोणतेही टीव्ही चॅनल सुरु केले तर, फक्त पृथ्वीराज चव्हाण सही करताना दिसतात. तीन वर्षात त्यांनी कधी फायलींवर सह्या केल्या नाही आणि जाहीरातीत मात्र त्यांनी स्वतःला कामाचा निपटारा करताना दाखवले आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी मंजूरी दिलेल्या फायलींची चौकशी केली पाहिजे, त्यातून ते किती क्लिन आहेत हे उघड होईल.' असा आरोप अजित पवारांनी केला.

'काँग्रेसकडे एवढी जाहीरातबाजी करण्यासाठी फंड कुठून आला,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, भाजपसोबतच्या युतीवर काय म्हणाले शरद पवार