आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena And Bjp Breakup Main Reason For Bhusawal Seat News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: फक्त एका जागेसाठी तुटली भाजप-शिवसेनेची 25 वर्षे जुनी मैत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: भाजपा-शिवसेनेच्या एका कार्यक्रमात नारळ फोडताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे)
महाराष्ट्रात हिंदुत्त्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर लढणार्‍या भाजप-शिवसेनेमधील 25 वर्षे जुनी मैत्री गुरुवारी (25 सप्टेंबर) संपुष्टात आली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेशी फारकत घेतल्याचे गुरुवारी जाहीर केले. युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत असले तरी 25 वर्षांची युती तुटण्यामागे अनेक कारणे आहेत. फक्त एका जागेवरून भाजप-सेनेमध्ये काडीमोड झाली आणि ती जागा म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघ.

शिवसेना मुख्यमंत्रीपदाभोवतीच फिरत होते. तसेच जागांवर अडून बसली होती. याच कारणामुळे एवढा मोठा निर्णय घ्यावा लागल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपने राष्ट्रवादीसोबत छुपी युती केल्याचा आरोप केला.
पुढील स्लाड्‍सवर याचा, एका 'भुसावळ'मुळे झाला भाजप-सेनेत घटस्फोट...