आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena And Bjp Seat Distribution Clashes News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१९९२ च्या पराभवातून भाजप, शिवसेना धडा घेणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागावाटपावरूनशिवसेना-भाजपमधील तिढा वाढला असून महायुती तुटण्यापर्यंत परिस्थिती चिघळली आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांपासूनची ही मैत्री तुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १९९२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन या दिवंगत नेत्यांनी युती तोडून स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी युतीला पालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. आता १९९२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास हाता तोंडाशी आलेल्या राज्याच्या सत्तेचा घास गमावण्याची भीती दाेन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना वाटते आहे.
शिवसेना आणि भाजप यांची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली. या युतीचे खरे शिल्पकार प्रमोद महाजन होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव ठेवला होता. शिवसेनाप्रमुखांनीही प्रतिसाद दिला. १९७९ मध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. भाजपने १९८० च्या विधानसभा निवडणुकीत १२ जागांवर यश मिळवले होते, तेव्हा शिवसेना शून्यावरच होती. १९८५ मध्ये विधानसभेत भाजपचे १६ आमदार, तर शिवसेनेचा फक्त आमदार होता. मात्र १९८५ मध्ये युती अस्तित्वात आली तेव्हा भाजपच्या वाट्याला लोकसभेच्या ३२, तर शिवसेनेकडे १६ जागा आल्या होत्या. परंतु नंतर शिवसेनेच्या जागांची संख्या हळूहळू वाढत गेली.
मैत्रीपूर्ण लढती हा भंपकपणा
१९९२मध्ये मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजप नेते प्रमोद महाजन यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. ते खालीलप्रमाणे...
जेलोकसभेत झाले, जे विधानसभेत झाले ते दुर्दैवाने मुंबई महापालिकेच्या बाबतीत होऊ शकले नाही. याचा अर्थ युती तुटली, युती फुटली, आम्ही कायमचे दुरावलो असे नव्हे. विभागांची फेररचना झाल्यामुळे आणि काँग्रेसने डावपेचांनी केल्यामुळे काही त्रांगडी निर्माण झाली. युती राहू द्या बाजूला, पण खुद्द शिवसेनेत आणि भारतीय जनता पार्टीतही एका जागेवर दोन-दोन नगरसेवकांचे हक्क शाबित होऊ लागले आणि जिथे पक्षांनाही हे जड जाऊ लागले तेथे युतीचे काय? राजकारणातील मैत्रीपूर्ण लढती या भंपक शब्दावर शिवसेना भारतीय जनता पार्टी यांचा विश्वास नसल्यामुळे हा प्रामाणिक मार्ग आम्ही चोखाळला आहे.
स्वबळाच्या खुमखुमीत सत्ता गमावली
युतीमध्ये१९९२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी कटुता निर्माण झाली आणि बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी संयुक्तपणे युती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या वेळी शिवसेनेला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आणि काँग्रेसने या संधीचा फायदा मिळवत सत्ता प्राप्त केली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे ११७ उमेदवार निवडून आले होते, तर शिवसेनेचे ६९ आणि भाजपचे फक्त १४ उमेदवार निवडून आले होते. या पराभवानंतर पुन्हा भाजप-शिवसेनेने युती केली आणि १९९५ मध्ये राज्याची सत्ता काबीज केली. ती आजतागायत कायम आहे.