आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leader Ramdas Kadam Comment On Eknath Khadse At Jalgaon

एकनाथ खडसेंची दीड दमडीचीही लायकी नाही : रामदास कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची दीड दमडीचीही लायकी नाही. महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्यासारखा निष्क्रीय विरोधी पक्षनेता झाला नसल्याची टीका रामदास कदम यांनी तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथील सभेत केली. मॅनेज होणारा विरोधी पक्षनेता हा शरद पवारांचा आरोप होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

शिवसेनेचे उमेदवार रामदास पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी वाजता सभा झाली. व्यासपीठावर तुकाराम कोळी, सहसंपर्क प्रमुख आर.ओ.पाटील, माजी मंत्री एम.के.पाटील, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, काशिनाथ गायकवाड, गोपाल दायमा, नाना कुमावत, नितीन पाटील, सुधाकर मोरे उपस्थित होते.

कदम म्हणाले की, शिवसेनेचा बोट धरून राज्यात विस्तारलेल्या भाजपने युती तोडून शिवसेनाच नव्हे तर मराठी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सत्तेच्या लालसेत भाजपने राम मंदिराचा मुद्दाही बाजूला ठेवला असून कॉंग्रेस-आघाडी सरकारने तर भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहे. शिवसेनेला चर्चेत अडकवून ठेवत युती तोडण्याचे मनसुबे भाजपने कधीच आखले होते.

शिवराळ भाषेत टीका
बनबरावपाचपुते, विजयकुमार गावित यांच्या भाजप प्रवेशाबद्दलही कदम यांनी खडसेंचा एकेरी शब्दात उल्लेख केला. शिवाय देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांचाही त्यांनी दोन ते तीन वेळा एकेरी शब्दात उल्लेख केला. शिवराळ भाषेत त्यांनी टीका केली अन् आपले शब्दही मागे घेतले.