आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा ठाकरे बंधूंमध्येच चुरस; युती- आघाडीतील भांडणे मनसेच्या पथ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजपची२५ वर्षांची युती आणि आघाडीचे १५ वर्षांचे संबंध तुटल्याने आता राज्यात पंचरंगी लढती रंगतील. या लढतीत मनसे आक्रमक झाल्यास मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होऊन उर्वरित चार पक्षांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची चिन्हे आहेत. मुंबई, ठाण्यामध्ये शिवसेनेला मनसे मोठ्या प्रमाणावर टक्कर देईल आणि त्यात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
मुंबई विभागात एकूण ३६ जागा असून २००९ मध्ये शिवसेनेने १९.४६ टक्के मतांसह जागा मिळवल्या होत्या तर भाजपने ११.९५ टक्के मतांसह जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसने १७ जागा, राष्ट्रवादीने जागा आणि सहा जागांवर मनसे विजयी झाली होती. मात्र आता मनसे आठ ते दहा जागांवर यश मिळवेल आणि मराठी, गुजराती मतांच्या साथीने भाजप ३-४ जागा मिळवण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही वेगळे लढत असल्याने काँग्रेस आठ आणि राष्ट्रवादी पाच ते सहा जागांवर विजय मिळवू शकेल.
ठाणे विभागात २४ जागा असून २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने २०.८६ टक्के मतांसह पाच जागांवर विजय मिळवला होता तर भाजपने ९.७४ टक्के मतांसह चार जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने फक्त एक तर राष्ट्रवादीने जागांवर विजय मिळवला होता. मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. आता पंचरंगी लढत होणार असल्याने मुंबईप्रमाणे ठाण्यातही मनसे किमया दाखवू शकते. मनसे पाच जागांपर्यंत वाढू शकते तर शिवसेनेच्या जागा तीनवर येतील. काँग्रेस आपली एक जागा कायम राखू शकेल, तर राष्ट्रवादीला एखाद्या जागेचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोकणात शिवसेनाच
कोकणविभागात १५ जागा असून २००९ च्या निवडणुकीत २३.२४ टक्के मतांसह शिवसेनेने चार जागा जिंकल्या तर ५.४९ टक्के मतांसह भाजपने एक जागा जिंकली होती. काँग्रेस दोन आणि राष्ट्रवादी पाच जागांवर विजयी झाली होती. कोकणात शिवसेनेची ताकद असून तेथे त्यांना विशेष फरक पडणार नाही. मात्र राष्ट्रवादी त्यांना चांगली टक्कर देऊ शकते. मनसे आणि काँग्रेस विशेष करिष्मा दाखवू शकणार नाही.
मराठी मते मनसेकडे
राजकीयविश्लेषक प्रकाश बाळ म्हणाले, मुंबई, ठाणे आणि कोकणात शिवसेना-भाजपला मोठा फटका बसेल असे वाटते. राज्यात भाजपचे संघटनात्मक बळ कमी असल्याने शिवसेनेपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होईल. मुंबईतील मराठी मते मनसेकडे वळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे.

मराठी, गुजराती मतांमध्ये पडेल फूट
पंचरंगी लढतीमुळे शिवसेनेला मुंबई, ठाणे येथील आपली सत्ता गमवावी लागेल. एवढेच नव्हे तर केंद्रातील मंत्रिपदही गमवावे लागेल असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितले. ‘मुंबई आणि ठाण्यात मराठी आणि गुजराती मतदारांमध्ये फूट पडून त्याचा सरळ-सरळ फटका शिवसेना-भाजपला बसेल. ही मते मनसेकडे वळू शकतात. ठाण्यात शिवसेना आपली पकड कायम ठेवण्याचा काही प्रयत्न करील, परंतु मनसे त्यांना टक्कर देईल. कोकणात सगळ्यात जास्त फटका भाजपलाच बसणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते,’ अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

एकत्र राहण्यातच होता आघाडीला फायदा
मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख सुरेंद्र जोंधळे यांनी सांगितले, मुंबईमध्ये शिवेसना आणि मनसे यांच्यातच खरी लढत होईल. या राजकीय परिस्थितीचा सर्वाधिक फायदा राज ठाकरे यांना होणार आहे. त्यामुळेच त्यांनी आजवर ठेवलेले मौन योग्यच होते असे म्हणावेसे वाटते. राज ठाकरे आपली संपूर्ण ताकद शिवसेना संपवण्यासाठी लावतील आणि त्यासाठी ते भाजपला मदत करतील. कोकणात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच खरी लढत पाहायला मिळेल. राष्ट्रवादीने काँग्रेसची आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय पक्ष विसर्जनाच्या दिशेने चाललेला आहे त्याचे प्रतीक आहे. खरे तर युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर त्यांना फायदा झाला असता.