आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Daily Hindi Saamana Attacks On Modi Personally

\'चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का नाही?\' उद्धव ठाकरेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे मतदान काही तासांवर येऊन ठेपल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? असे म्हटले आहे. पक्षाचे मुखपत्र 'सामाना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपचा मुख्यमंत्री हा संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरेल असे ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर म्हटले आहे. दुसरीकडे 'दोपहर का सामना' या दैनिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. त्यापासून शिवसेनेने फारकत घेतली आहे.

'सामना'ला मुलाखत
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनचे मुखपत्र 'सामना'ला आज मुलाखत दिली आहे. उद्याच्या (बुधवार) अंकात ती प्रकाशित केली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ठासून सांगितले आहे. त्याच बरोबर स्वतःही मुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही.' उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठीचे असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. भाजपसोबतची 25 वर्षांची युती तुटल्याचे दुःख आहेच, पण मी त्यांना शरण गेलो नाही, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

'दोपहर का सामना' मधून मोदींवर शेलक्या शब्दात टीका
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'दोपहर का सामना' मधून आज (मंगळवार) शिवसेनेने आतापर्यंतची सर्वात जहरी टीका केली आहे. काही तासांपूर्वी प्रकाशित झालेल्या या दैनिकातील एका लेखात नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करण्यात आली आहे. दैनिकाचे संपादक प्रेम शुक्ला लिखित या लेखात म्हटले आहे, की 'एकट्याच्या जोरावर भाजपला जनादेश मिळणे कठीण होते. जर शिवसेनेने भाजपच्या चालीने लोकसभेत पहिले डाव मारला असता तर मोदींचे वडील दामोदरदासही भाजपला 2014 मध्ये पूर्ण बहुमत मिळवून देऊ शकले नसते.' 'दोपहर का सामना'चे संपादक प्रेम शुक्ला यांनी दैनिकात प्रकाशित या टीप्पणीला योग्य म्हटले आहे. ते म्हणाले, भाजप शिवसेनेवर वारंवार हल्ला करत आहे, अशावेळेस आम्ही एखाद्या म्हणीचा वापर केला तर त्यावर एवढा अकांड-तांडव करण्याची गरज नाही. तर, उद्धव ठाकरे यांनी या लेखाशी शिवसेनेचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'दोपहर का सामना' मधील लेख आणि फडणवीसांचे ट्विट