औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाने युती का तोडली, हिंदूत्वाचे नाते का तोडले, असा सवाल उपस्थित करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. कालपर्यंत आमच्यासोबत संभाजीनगर म्हणणारे आता औरंगाबाद कसे काय म्हणायला लागेल? असा प्रश्न त्यांनी येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपस्थित केला. यावेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद मध्यचे पक्षाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट, पूर्वच्या उमेदवार कला ओझा, गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंबादास दानवे उपस्थित होते.
एमआयएमचा उल्लेख करुन उद्धव ठाकरे म्हणाले, 'हिरवे संकट घरात घुसत असताना भाजपने युती तोडली.' अजित पवार काल खुलताबादला आले, वाटलं की ते भद्रा मारुतीचे दर्शन घेतील. पण नाही, ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले आणि तिथे जाऊन अलिगड विद्यापीठाचे आश्वासन देतात.
भाषणातील महत्त्वाचे मु्द्दे
- औरंगाबादला टुरिझम हब बनवण्याचे आश्वासन.
- मोदींना शरद पवारांना एनडीएत आणण्याची इच्छा होती. माझ्यामुळे ते एकत्र येऊ शकले नाही.