आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने बाळासाहेबांचा विश्वासघात केला, लाट सातार्‍यात का नव्हती; उद्धव यांचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फलटण (सातार) - भारतीय जनता पक्षाला वेगळा विदर्भ करुन महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. शिवसेनेसोबत राहून त्यांना हे शक्य नव्हते म्हणून त्यांनी युती तोडली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी विश्वासघात केला, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, त्याचबरोबर शिवसैनिकांचे कामही त्यांच्या जोडीला होते, असे सांगत उद्धव यांनी आता मोदी लाट नसल्याचे म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार तासगावकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी लाट आता उरली नसल्याचा पुनर्रुच्चार येथे केला. ते म्हणाले, 'मोदी लाट नव्हती हे आम्ही कधी नाकारलेच नाही. मोदी लाट होती, मात्र त्यासोबतच शिवसेनेची साथ होती.' सातारा लोकसभेचा उल्लेख करुन उद्धव म्हणाले, महाराष्ट्रात मोदी लाट होती तर, मग सातार्‍यात ती का चालली नाही, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला करताना उद्धव ठाकरे म्हणाले, युतीची साडेचार वर्षांची कारकिर्द सोडली तर, काँग्रेसचीच सत्ता आहे. तुमच्या मतांवर ते साखरसम्राट, शिक्षणसम्राट झाले आणि कारखान्यात शेतकर्‍याची पिळवणूक त्यांनीच केली. तुमच्या मुलांना डोनेशनशिवाय त्यांच्या संस्थांमध्ये प्रेवश देखील मिळत नाही. ही परिस्थिती कधी बदलणार, असा सवाल त्यांनी जनतेला केला.
आघाडी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह लावताना ठाकरे म्हणाले, 'धरणे बांधली पण कालवेच केले नाही. साखर कारखाने उभारल्यानंतर त्यात झोन बंदी लागू केली.'
शिवसेनेचे सरकार आले तर, ज्या प्रमाणे झोन बंदी उठली तशीच साखर निर्यात बंदी देखील उठवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.