महाराष्ट्रात सर्वत्र सध्या निवडणूकीचीच रणधुमाळी आहे. जिकडे तिकडे निव़डणूकीचे प्रचारच दिसत आहेत. विविध वाहिन्यांवरही पक्षांच्या जाहिरातींचा पाऊस पडतोय. त्यातच तरुणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या व्हाट्सअपवरही या पक्षांनी
आपापल्या पध्दतीने प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच भारतीय जनता पार्टी (भाजप)ची जाहिरात "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" ही सध्या टॉपवर आहे. या जाहिरातीमुळे व्हाट्सअपवर शेकडो जोक्स तयार झाले आहेत. जो तो आपापल्या ग्रूपमध्ये हे जोक्स पसरवत आहे. त्यातून अनेक जण आपापल्या पध्दतीने एडीट करून त्यातून एका नव्या जोकला जन्म देत आहेत. या जोक्सचा भडीमार एवढी होत आहे की, दिवसाला जवळपास २० ते २५ पेक्षाही जास्त मॅसेजेस येत आहेत. तर याच मॅसेजेसला प्रतिउत्तर देणारे फोटो आणि मॅसेजही सध्या जोरदार फिरत आहेत. भारताच्या नकाशातील महाराष्ट्र दाखवून "इथेच होता आणि इथेच राहाणार महाराष्ट्र माझा".. अशा आशयाचेही अनेक पोस्ट व्हाट्स अपवर फिरत आहेत. पाहूयात व्हॉट्सअपवरील अशाच मॅसेजेसचे स्क्रीनशॉट्स...