आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Gives Six Women MLA To State News In Divya Marathi

जिल्ह्याने दिल्या आजवर सहा महिला आमदार; पाच काँग्रेसच्या तर एक राष्ट्रवादीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १९६२ते २००९ पर्यंतच्या आजवरच्या विधानभसा निवडणुकीतून केवळ सहा महिलांना आमदार होण्याचा मान मिळाला. तर सहा निवडणुकांमध्ये एकही महिला आमदार म्हणून निवडून येऊ शकली नाही. सोलापूर जिल्ह्यातील हे चित्र महिलांच्या दृष्टीने राजकारणात फारसा वाव नसल्याचेच दर्शवणारे आहे. २००९ च्या निवडणुकीत पाच महिलांनी निवडणुकीसाठी पदर खोचला, पण केवळ दोघींना विधानसभेत पोहोचता आले. आजवरच्या सहा महिला आमदारांमध्ये पाच आमदार या काँग्रेस पक्षाच्या होत्या, तर एक शामल बागल या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या.

सलग पाच निवडणुकांत महिला आमदार नाहीत. १९६२ मध्येच आमदारकीचे खाते खोलणाऱ्या महिलांना १९७८, १९८५, १९९०, १९९५, १९९९ या सलग पाच निवडणुकांमध्ये विजयाचे खाते खोलता आले नाही. झाडबुकेंचा बार्शीत १९९५, विमलताई बोराडे (१९९५) यांना पराभव पत्करावा लागला. तर विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांना १९८५ च्या निवडणुकीत मंगळवेढ्यातून पराभूत व्हावे लागले होते. २००९ च्या निवडणुकीत शामल बागल (करमाळा, राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणिती शिंदे (शहर मध्य, काँग्रेस) भारती यादगिरीकर (अपक्ष, दक्षिण सोलापूर) नागमणी जक्कन (अपक्ष, शहर उत्तर) मैदानात होत्या.
यावेळी उतरल्या ११ उमेदवार
गेल्यावेळच्या(२००९) निवडणुकीत पाच महिला आमदार होत्या, तर यावेळच्या निवडणुकीत उतरलेल्या महिलांची संख्या दुपटीने वाढली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस, शहर मध्य) या एकमेवर आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. करमाळ्याच्या आमदार शामल बागल यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदाच भाजपनेही महिला उमेदवार दिला आहे. शहर मध्यमधून नगरसेविका मोहिनी पत्की या लढत देत आहेत.

यंदाच्या उमेदवार :
प्रणिती शिंदे (शहरमध्य, काँग्रेस)
रश्मीबागल (करमाळा,राष्ट्रवादी काँग्रेस)
मोहिनीपत्की (शहरमध्य, भाजप)
विद्यालोलगे (शहरमध्य, राष्ट्रवादी काँग्रेस)
नागमणीजक्कन (शहरउत्तर शहर मध्य, अपक्ष)
शोभाशिंदे (शहरमध्य, अपक्ष)
हिराबाईशिंदे (शहरमध्य, अपक्ष)
सुवर्णाशिवपुजे (बार्शी,अपक्ष)
रत्नप्रभापाटील (मंगळवेढा-पंढरपूर,अपक्ष)
छायाकेवळे (मोहोळ,अपक्ष)
रेश्मापटेल (दक्षिणसोलापूर, अपक्ष)
यांना मिळाला आमदारकीचा मान
निर्मलाराजे भोसले (१९६२,अक्कलकोट)
प्रभाताईझाडबुके (१९६२,बार्शी)
निर्मलाताईठोकळ (१९७२,शहर दक्षिण)
विमलताईबोराडे (१९८०,मंगळवेढा)
प्रणितीशिंदे (२००९,शहर मध्य)
शामलबागल (२००९,करमाळा)
पुढील स्लाईडवर पाहा, कोण आहे या महिला उमेदवार..