आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia And Rahul Gandhi's Election Campain Planning In Maharashtra

सोनिया आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात प्रत्येकी दहा ते बारा सभा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित)
नवी दिल्ली - कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात प्रत्येकी 10 ते 12 सभा आणि रॅली होणार आहेत. सोबतच कॉँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेतेही कॉँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
सोनिया गांधी या प्रचाराला दि. 6 ऑक्टोबरपासून सुरुवात करतील त्या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात सभा आणि रॅलीच्या माध्यमातून कॉँग्रेसचा प्रचार करणार आहेत. राहुल गांधी हेही सहा दिवस प्रचार करणार असल्याची माहिती कॉँग्रेसच्या सुत्रांनी दिली. शिवाय दिग्विजय सिंग, ऑस्कर फर्नांडीस, गुलाम नबी आझाद, मोहन प्रकाश, मुकुल वासनिक यांच्या सभा होणार आहेत. परंतु माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे प्रचारात सहभागी होतील किंवा नाही याबाबत अद्याप निर्णय होऊ शकला नाही.
विविध समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे कॉँग्रेसचे देशातील अन्य नेते महाराष्ट्रात येऊन सभा घेण्यावरही कॉँग्रेसने भर दिला असल्याची माहिती सुत्राने दिली.