आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Jain And Gulabrao Devkar News In Marathi, Jalgaon

कारागृहातून हलणार सूत्रे: सुरेश जैन, देवकर यांना "आप्तेष्टांना' भेटीची परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जळगाव मतदारसंघाची सूत्रे आता धुळे कारागृहातून हलणार आहेत. धुळे विशेष न्यायालयाने शिवसेना आमदार सुरेश जैन राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना निवडणूक काळात आवश्यक व्यक्तींना कारागृहात जाऊन भेटण्यास परवानगी दिली आहे. मात्र या काळात जैन, देवकर यांना बाहेर जाण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जळगाव शहर ग्रामीण मतदारसंघातून अनुक्रमे सुरेश जैन गुलाबराव देवकर इच्छुक आहेत. निवडणूक काळात सूचक, अनुमोदक, कायदेशीर सल्लगार, ऑडिटर आदींना भेटण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज जैन देवकर यांनी दाखल केला होता. विशेष न्या. आर. आर. कदम यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जैन देवकर यांच्या वकिलांनी संबंधितांच्या नावाची यादी दिली आहे. याशिवाय देवकर यांच्या वकिलांनी धुळ्यातील एक नोटरी तर जैन यांच्या वतीने दोन नोटरीची नावे सुचविण्यात आली आहेत. या व्यक्तीने कारागृहात आवश्यक ओळख दिल्यानंतर जैन, देवकर यांना भेटता येऊ शकेल.

दरम्यान देवकर यांनी चार तर जैन यांनी २६ जणांची यादी सादर केली आहे. या अर्जाला सरकारी वकील श्यामकांत पाटील यांनी हरकत घेतली होती. तर सुरक्षेच्या कारणास्तव जळगाव कारागृहात हलवावे, असा विजय कोल्हे यांचा अर्ज मात्र फेटाळण्यात आला आहे.

३० जण भेटीला
जैनयांच्या यादीत दोन नोटरी, ११ सूचक, चार कौटुंबिक सदस्य, चार सल्लागार, दोन अकाउंटंट तर प्रत्येकी एक ऑडिटर, टॅक्स कन्सलटंट ऑडिटर यांची नावे आहेत. तर देवकरांच्या यादीत प्रत्येकी एक नोटरी, स्वीय सहायक, बँक व्यवस्थापक अकाउंटंट यांचा उल्लेख आहे.

जेल मॅन्युलचा आदर्श : कारागृह अधीक्षक यांच्या समक्ष दोघांना नामांकन दाखल, शपथपत्र नोटरीची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर अधीक्षक हे निवडणूक शाखेशी संपर्क साधून याबाबत माहिती देतील. कारागृह प्रशासनाच्या कायद्याचा उल्लेख असलेल्या जेल मॅन्युलच्या तरतुदीनुसार ही प्रक्रिया पूर्ण होईल.