भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्यदिव्य असा शपथविधी नुकताच आटोपला. त्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आली. काही उत्साही वाहिन्यांनी फडणवीसांच्या मुलाखती झळकवल्या. त्यावर चर्चा घडवून आणल्या. फडणवीसांच्या रुपाने राज्याला एक दमदार मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न झालाय, असे भासवण्यात आले. पण तरीही फडणवीसांचा जनतेवर प्रभावच पडेना. भाजपचे मंत्रिमंडळही प्रभावी वाटेना. एक सक्षम सरकार राज्यात आले आहे, असे जराही भासेना, अशी परिस्थिती दिसून येत आहे. यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अशी 10 ठळक कारणे सापडली आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाची एक जागा धरुन एकूण 123 जागा मिळाल्या. ही संख्या बहुमताच्या जवळपासही नाही. अपक्षांचा पाठिंबा मिळाला तरी भाजप बहुमताजवळ जाऊ शकत नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर कोणत्या तरी मोठ्या पक्षाचा पाठिंबा असणे भाजपला अनिवार्य आहे. राष्ट्रवादीने मतमोजणी झाल्यानंतर लगेच भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता. तर शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा म्हणजे बचावात्मक सरकार चालवणे आणि शिवसेनाचा घ्यायचा म्हणते त्यांच्या अटी मान्य करणे, असे दुहेरी संकट भाजपसमोर आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणती 10 कारणे आहेत ज्यामुळे फडणवीस सरकार प्रभावहीन वाटत आहे....जनतेवर या सरकारचा जराही प्रभाव पडताना दिसून येत नाही...