आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर मुंबई मनपाची सत्ता पुन्हा गमावण्याची वेळ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागावाटपाच्या मुद्द्यावर ताठर भूमिका कायम ठेवल्यास शिवसेना- भाजपची युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील हाती आलेली सत्ता गमावण्याबरोबरच मुंबई महापालिकेच्या सत्तेवरही त्यांना १९९२ प्रमाणे पाणी सोडण्याची परिस्थिती उद‌्भवू शकते.
सुमारे २१ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेवरही युतीची अनेक वर्षांपासून सत्ता आहे. भाजप सोबतीला आल्यानंतर सलग पाचव्यांदा शिवसेनेने ही महानगरपालिका काबीज केलेली आहे. सध्या या पालिकेत शिवसेनेचे ७५ तर भाजपचे ३० नगरसेवक आहेत आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाईंचा एक नगरसेवक आहे. दुसरीकडे काँग्रेस ४८, राष्ट्रवादी १८ आणि मनसेचे २८ नगरसेवक आहेत. आता युती तुटली तर महापालिकेतील भाजपचे ३० सदस्य शिवसेनेचा पाठिंबा काढू शकतील आणि अल्पमतात आल्यानंतर शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल. या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतील. त्यांना समाजवादी पक्षाचे नगरसेवकही मदत करू शकतील.
पालिकेत युती तुटेल असे वाटत नाही
विधानसभेतमहायुती तुटली तर लगेचच भाजपचे नगरसेवक वेगळे होतील असे नाही. विधानसभेच्या निकालानंतरही हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. मात्र राज्यात युतीची सत्ता आली नाही तर मात्र महापालिकेतही शिवसेना-भाजप वेगळे होतील आणि युतीची सत्ता जाऊ शकते.
- प्रकाश बाळ, राजकीयअभ्यासक