आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Third Aghadi In Vidhansabha Election News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात तिसर्‍या आघाडीची मोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिहार मधीललालू-नितीश आणि उत्तर प्रदेशातील मायावती-मुलायम यांच्या तिसर्‍या मोर्चाचे पोटनिवडणुकीतील यश पाहून राज्यातील तीन पुरोगामी आघाड्यांनी विधानसभा निवडणुकीत सशक्त "तिसरा पर्याय' उभाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी या महाआघाडीची घोषणा होणार आहे.
२००९ च्या निवडणुकीत राज्यात "रिडालोस' नावाने तिसरी आघाडी स्थापन झाली होती. यामध्ये "रिपाइं'चे रामदास आठवले, शेकापचे एन. डी. पाटील आणि डावे पक्ष सहभागी होते. मात्र, शेकाप, माकपचा अपवाद वगळता आघाडीतील इतर घटक पक्षांना एकही जागा मिळाली नाही.
राज्यात सध्या तीन पुरोगामी आघाड्या आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र लोकशाही आघाडी, भाई जयंत पाटील यांची महाराष्ट्र डावी लोकशाही समिती शिवराज्य पक्षाचे ब्रिगेडियरसुधीर यांचा संविधान मोर्चा. महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी वेगवेगळे लढल्यास निभाव लागणार नाही, असे त्यांना वाटते. त्यातच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेशात तिसर्‍या आघाड्यांना यश मिळाल्याने पुरोगामी पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे तिन्ही आघाड्यांना एकत्र येण्याचा नरि्णय घेतला आहे.
भाई जयंत पाटील, अॅड. प्रकाश आंबेडकर, हनुमंत उपरे, सुधीर सावंत, लोकशासन आंदोलनाचे न्या. पी. बी. कोळसे, भाकपचे भालचंद्र कांगो, माकपचे कॉ. अशोक ढवळे या आघाडीचे सूत्रधार असतील.
येथेप्रभाव राहील : ठाणे,नाशिक, सोलापूर (माकप), नवी मुंबई, रायगड, सोलापूर (शेकाप), शिवराज्य (सिंधुदुर्ग, रत्नागिरी), अकोला, मुंबई (भारिप), लोकशासन मोर्चा (अहमदनगर), मालेगाव (जनता दल), येथे तिसर्‍या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रभाव पडू शकतो.
२० पक्षांची मोट
१.संविधान मोर्चा : शिवराज्यपक्ष, सत्यशोधक ओबीसी आंदोलन, लोकशासन मोर्चा, रिपब्लिकन सेना.
२.महाराष्ट्र डावी समिती : भाकप,माकप, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से.).
३.महाराष्ट्र लोकशाही आघाडी : भारिप-बहुजनमहासंघ, लाल निशाण पक्ष, लोकभारती संघटना, समाजवादी पक्ष.