आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपा, भारिप, बसप वगळून तिसरी आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेकापप्रणीत महाराष्ट्र डावी लोकशाही समिती आणि शिवराज्य प्रणीत संविधान मोर्चा या दोन आघाड्यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची मुंबईत मंगळवारी घोषणा केली. बसप, भारिप आणि समाजवादी असे काहीसा जनाधार असणाऱ्या पक्षांना वगळून आघाडीची घोषणा केल्यामुळे याला तिसरी आघाडी कशी म्हणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिन्याभरापूर्वी शेकापच्या झेंड्याखाली भाकप, माकप, जनता दल (से.) यांनी महाराष्ट्र डावी लोकशाही समिती स्थापन केली आहे. माजी न्या. पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक ओबीसी पार्टी, शिवसंग्राम, रिपब्लिकन सेना आणि लोकशासन आंदोलन पक्ष यांनी संविधान नावाची आघाडी स्थापन केली. या दोन छोट्या आघाड्या आता एकत्रित आल्या आहेत. या दोन आघाड्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी केली आहे.