आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही निवडणूक मुख्यमंत्रीपदासाठी नाही, तर युवकांच्या भवितव्यासाठी आहे - पंतप्राधन मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणूक आयोगाने निवडणूकीची जी १५ ऑक्टोबर तारीख काढली आहे ही तारिख म्हणजे महाराष्ट्राला पापातून मुक्त करण्याची तारीख आहे. मागील १५ वर्षापासून जे पाप आघाडी सरकारने केले आहे, जे युवकांचे वाटोळे केले आहे ते आता थांबवण्याची ही तारीख आहे. ही निवडणूक कोण्याएका पक्षाची नाही, मुख्यमंत्र्याची नाही, तर ही निवडणूक आहे महाराष्ट्रातील युवकांच्या भवितव्याची आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाजपाला प्रचंड बहूमताने विजयी करा असे आवाहन केले. ते आज (मंगळवार) नाशिक येथे बोलत होते.
स्वच्छ भारत अभियानाबद्दल मोदींचा आग्रह याही सभेत दिसून आला. मोदी म्हणाले की, येत्या १४ नोव्हेंबरला पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. तर त्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींची सभा आहे. पंडीत नेहरू यांना लहान मुले आवडायचे. म्हणून मी संपूर्ण देशात १४ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान देशातील सर्व शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करणार आहे.
विरोधी पक्षांकडून मोदी सरकारने आतापर्यंत काय केले अशी टिका केली होती. त्या टिकेला मोदी यांनी उत्तर दिले. मोदी म्हणाले की, "ज्या सरकारने ६० वर्षे कोणताच हिशोब दिला नाही, तर ते मोदींना ६० दिवसांचा हिशोब काय मागतात? काँग्रेस वाल्यांनो जरी तुम्ही ६० वर्षांचा हिशोब दिला नसेल तरी मोदी सरकार त्याच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब देणार आहे. येत्या पाच वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब मी तुम्हाला नक्की देणार आहे", असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी या सभेत दिले.