आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त या एन्काऊंटर स्पेशालिस्टची संपत्ती; पत्नीकडेही आहेत कोट्यावधी रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा - फाइल फोटो)

मुंबई -
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत कोणता पक्ष जिंकेल याबद्दल सध्या सर्वच ठिकाणी चर्चा सुरू आहेत. तसेच नेत्यांच्या संपत्तीबाबतीतही अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. नुकतेच नेत्यांच्या संपत्तीशी संबंधीत उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे प्रकरण कोणा दुसर्‍याचे नाही तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसमधील एन्काऊंटर स्पेशलिस्टशी संबंधीत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूकीच्या जाहिरनाम्यात त्यांची संपत्ती 13.82 कोटी एवढी सांगितली आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसमधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी त्यांची संपत्ती 38.43 कोटी एवढी सांगितली आहे. म्हणजेच शर्मा यांची संपत्ती माजी मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त असल्याचे उघडकीस आले आहे.
प्रदीप शर्मा यांना मुंबईच्या अंधेरी (इस्ट) मतदार संघातून आरपीआयकडून तिकिट मिळाले आहे. त्यांनी जाहिरनाम्यात त्यांची एकूण संपत्ती 38 कोटी 43 लाख रुपये सांगितली आहे. यामध्ये अंधेरी आणि ठाण्यातील फ्लॅट आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावे 14 कोटींची संपत्ती आणि त्यांनी 11.50 कोटी रुपयांचे प्रायव्हेट लोन सुध्दा ठेवले आहे.

भाजप-शिवसेना-आरपीआय यांची युती तुटल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी अंधेरीतील मतदार संघातील आपले उमेदवारी मागे घेतली होती. उमेदवारी मागे घेतालाना आपल्यासाठी पोलिस प्रथम स्थानावर आहे आणि राजकारण दुसर्‍या स्थानावर असे प्रदीप म्हणाले होते.

पुढील स्लाईडवर वाचा, अंडरवर्ल्ड संबंध असल्यामुळे केले होते निलंबित