पंढरपुर (सोलापूर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (रविवार) भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस आणि त्यांचा एकेकाळचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधान म्हणाले, 'राष्ट्रवादी पक्ष जेव्हापासून स्थापन झाला आहे, तेव्हापासून महाराष्ट्रात काहीही बदलले नाही. भ्रष्टाचार हा एकमेव उद्देश या पक्षाचा राहिला आहे.' जनतेला उद्देशून ते म्हणाले, 'तुम्ही महाराष्ट्र लुटारूंच्या हातात देणार का?' महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. मोदी म्हणाले, 2014 हे वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांच्या सत्तेचे शेवटचे वर्ष राहाणार आहे.
पंढरपुर हे महाराष्ट्रातील जनतेसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. दरवर्षी लाको लोक येथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. त्यामुळे पंढरपूरला धार्मिक पर्यटनस्थळ करण्याचा मनोदय पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पंढरपुर येथील सभेला जमलेला जनसमुदाय.