आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: उद्धव-राज मनोमिलन हे उशिरा सुचलेले शहाणपण तर नाही, जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मिलाफावरुन गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी आज एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या खुलाश्यावरुन या चर्चेला पुर्णविराम मिळाला, की पुन्हा हवा मिळाली हे ठरवणे सध्या अवघड आहे. तरीही भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तोडलेली युती आणि त्यानंतर उद्धव यांनी राज यांना दिलेली मदतीची हाक हे उशिरा सुचलेले शहाणपण तर नाही, असेही बोलले आहे. ठाकरे बंधुंनी आधिच एकत्र येणार असल्याचे जाहीर केले असते, एकत्र प्रचार सभा घेतल्या असत्या तर त्याचे रुपांतर मतांमध्ये झाले असते. पण आज राज यांनी दिलेल्या खुलाश्याने नेमके काय झाले यासंदर्भात संदिग्धता राहिली नसली तरी नवीन प्रश्नांनी जन्म घेतला आहे.
राज ठाकरे यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. त्यानंतर त्यांनी तीन पर्याय दिले. एक, आताच बोलणी सुरु करावी. दोन, प्रचार सभेत एकमेकांवर आरोप करायचे नाही. आणि तिसरा, निवडणुकीनंतर एकत्र यायचे. पण आमच्यात बोलणीच झाली नाही. शिवसेनेने सकारात्मक पवित्रात घेतला नाही.
राज यांनी आज केलेल्या खुलाश्याने ठाकरे बंधुंमधील मिलाफाला मनसे सकारात्मक होती. पण शिवसेनेने प्रतिसाद दिला नाही, हे स्पष्ट झाले. पण आता पुढे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे. दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे आताच सांगणे अवघड आहे. ठाकरे बंधू आताच एकत्र आले असते, तर जनतेला एक भक्कम पर्याय मिळाला असता. जनतेने भरभरुन मतदान केले असते. पण अजूनही संदिग्धता कायम आहे. ती मतांमध्ये उमटली तर मिलाफाला कसलाही अर्थ राहणार नाही. ती केवळ एक भावनिक बाब होऊन बसेल.
पुढील स्लाईडवर वाचा, निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या कोणत्या दुष्पपरिणांना ठाकरे बंधुंना सामोरे जावे लागेल...