आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांसाठीच नव्हे, सत्ता कर्जमुक्तीसाठी वापरा - उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘केंद्रातील सत्तेचा वापर केवळ भाजपसाठी मते मागण्यासाठी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी’, अशी उपहासात्मक मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अकोल्यातील सभेत केली. ‘राज्यात मजबूत सरकार आणा, केंद्राला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडू. भावी पिढीला चांगले दिवस दाखवायचे असतील तर राज्यात परिवर्तन घडवा’, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

येथील सभेत ठाकरे म्हणाले, ‘संकटकाळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून केंद्रातील सत्ता मिळवली आणि शिवसेनेला खड्यासारखे बाहेर काढले. तुम्ही विश्वासघातकी आहात, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा,’ असा सवालही त्यांनी विचारला. ‘जनता कोणाच्या पाठीशी आहे या विधानसभा निवडणुकीत कळेलच. शिवसेनेला एकटे पाडाला असे समजत असाल तर हा महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही’, असेही ठाकरे यांनी ठणकावले.
भाजप विश्वासघातकी
बाळासाहेब, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे युती टिकून राहिली, अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली. आम्ही पंचवीस वर्षे एकत्र राहिलो. कालपर्यंत भाजपला हिंदुत्व, भगव्याची साथ हवी होती. आता मित्र नकोसा झाला. अशा विश्वासघातकी लोकांवर विश्वास ठेवायचा कसा?, या शब्दात ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.