आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Rally Of Shivsena Chief Uddhav Thackrey In Tuljapur.

भाजपवाले काय युती तोडणार, ती तर तुळजाभवानीची इच्छा -उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी तुळजापुरात जाहीर सभा झाली. युती तुटावी ही कदाचित तुळजाभवानीचीच इच्छा असावी, तसे संकेत त्याचवेळी मिळाले होते. त्यामुळे भाजपवाले काय युती तोडणार अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे....
विधानसभेवर भगवा फडकायचा असेल तर तुळजापुरात भगवा असावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. पण ही जागा भाजपकडे गेली तर काय? असा प्रश्न मला होता. तरी कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. त्याचवेळी युती तुटल्याची बातमी मिळाली. त्यामुळे मी भरभरून द्यायला तयार असताना युतीत काय अडकता असा संकेतच जणू आई तुळजाभवानीने मला दिला. म्हणून युती तुटावी ही भाजपची नव्हे तर तुळजाभवानीचीच इच्छा असावी असे मला वाटते.
राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सगळेच मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री सगळेच सभांचा धडाका लावत आहेत. तुम्ही मला सत्ता द्या म्हणजे पाहा मी किती महाराष्ट्र तयार करतो, पाहा मी किती तुकडे करतो, असे ते म्हणत असावेत. गोपीनाथ मुंडे असते तर युतीची अशी अवस्था झाली नसती. ते युती जोडून ठेवणारे होते. त्यामुळे मुंडे महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध जपणार आहे.
आतापर्यंत अनेकांनी सत्ता उपभोगली पण तुळजापूरचा विकास करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. राज्याचा विकास करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आम्ही समाजातील सगळ्यांचा विकास तयार करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मी तुळजापूरचा आणि राज्याचाही विकास करणार आहे. त्या सर्व बाबी मी वेळोवेळी सर्वांना दाखवल्या आहेत. सगळ्या योजना माझ्या हातात तयार आहेत. त्या तुम्ही तुमच्या हातात घ्यायच्या की नाही, ते तुम्ही ठरवायचे आहे. त्यामुळे मला तुमच्याकडून राज्यात विजयाचे वचन हवे आहे.