आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवछत्रपतींचे आशिर्वाद मागता, पण शिवजयंतीची तारीख माहिती आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - परभणी येथे झालेल्या प्रचारसभेच उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला. भाजपबरोबर युती हिंदुत्वाच्या मुद्यावर केली होती, जागांसाठी नव्हे. पण भाजपची जागांची मागणी वाढतच चालली होती. हव्यासापोटी भाजपने युती तोडल्याचे उद्धव म्हणाले. शिवछत्रपतींच्या नावावर मते मागता पण त्याच शिवरायांची जयंती तिथीनुसार कधी येते हे तरी माहिती आहे का? अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले.
नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतक-यांना दिलेले पीककर्ज माफ करण्याचे वचन पाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी पंतप्रधानांना दिले. दरम्यान मुस्लीम बांधवांशी आमचे वैर नाही. पण ओवेसी सारख्या विषाची मस्ती सहन करणार नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या परभणीतील सभेत केलेल्या भाषणाचा अंश ...
जगदंबेने जनतेच्या रुपात भवानी तलवार माझ्या हातात दिली आहे. ती तलवारच नवे राज्य निर्माण करणार आहे. मला आव्हान दिल्यास मी ठरवले तर मुख्यमंत्री होइलच, असे मी म्हटलो होतो. त्यावर उद्धव ठाकरेंना अनुभव काय? असे ते म्हणाले. पण यांना तीन वर्षांचा अनुभव होता तर फाइली हालत का नव्हत्या.

परभणी शिवसेनेचा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. कोणाच्या कितीही पिढ्या मैदानात उतरल्या तरी हा किल्ला तुटू शकत नाही. 25 वर्षांच्या युतीतून मुक्त होऊन तुमच्यात आलो आहे. आता येणारे सरकार आपले असणार आहे. त्यामुळे तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. आजही इकडे दुष्काळच आहे. पाऊस येऊन गेला तो परत आलाच नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठवाडा गारपीटग्रस्त होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि मी मुंबईत एक पत्रकार परिषदेत सांगितले होते की गारपीटग्रस्तांचे पीककर्ज माफ करू. मी आज नरेंद्र मोदींना जाहीर विनंती करतो की शेतक-यांना कर्जमुक्त करून तुम्ही शब्द पाळावा. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भयानक संकट आले होते. आपल्याकडेही पुण्यात माळीण गावात संकट आले होते. मोदींनी काश्मीरमध्ये जाऊन दौरा केला. मदत जाहीर केली. पाकव्याप्त काश्मीरसाठीही मदत देऊ केली. माणुसकी दाखवली. तीच माणुसकी गारपीटग्रस्त शेतक-यांना दाखवावी ही मोदींना विनंती आहे.
भाजपवर सडकून टीका
भाजपने गरज सरो आणि वैद्य मरोप्रमाणे आमचा वापर करून घेतला. कधी शिवजयंती साजरी केली नाही आणि शिवछत्रपतींचा आशिर्वाद मागता. पण शिवरायांचे आशीर्वाद पेलायला मावळ्याची छाती लागते. तो सर्वांना पेलत नाही. गेले 25 वर्ष युती टिकवली. युती जागा वाटपावर झाली नव्हती तर हिंदुत्वावर झाली होती. आजही आम्ही आमच्या मुद्यावर, विचारावर कायम आहोत. आमचे मुस्लीमांशी भांडण नाही. देशाला मातृभूमी मानणारे कायम आमचे बांधव आहेत. पण ओवेसी सारख्या विषाची मस्ती आम्ही सहन करणार नाही. इथे राहून पाकिस्तानचे स्वप्न पाहणा-यांना माफ करणार नाही.
जागा वाटपावर नेहमी आमचे वाद व्हायचे. मुडेंप्रमाणेच आज प्रमोदजी महाजन यांचीही आठवण येते. कारण त्यांना सत्य परिस्थिती समजत होती. पण आज आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. तुमचा पक्ष वाढला तर आमचा पक्ष वाढला नाही का? लोकसभेत विक्रम तुम्ही एकट्यांनी केला नाही. सगळ्यांनीच ते घडवून आणले आहे. शिवसैनिकांची तिसरी पीढी मैदानात उतरली आहे. जागांचा विचार केला तर आम्ही तीन जिल्ह्यांच्या जागा सोडल्या. पण तरीही बोलणीनंतरही शब्द बदलला. चांगल्या जागा मागितल्या. त्यांना बोलण्याचे सौजन्य नव्हते मग मी केले ते योग्य नाही का?
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने गेली पंधरा वर्षे फक्त घोटाळे केले. सगळीकडे केवळ घोटाळ्यांचीच चर्चा होती. त्यांच्या कामाचा कुठे उल्लेखही नाही. सगळीकडे घोटळ्यात कोणी किती पैसे कमावले याबाबतच भांडणे सुरू होती, असे उद्धव म्हणाले.