आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव आणि आदित्य ठाकरेंची जनतेला भावनिक साद, नतमस्तक होऊन मागितली मते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये आयोजित एक सभेत व्यासपीठावरच नतमस्तक होऊन उपस्थित जनतेला भावनिक आवाहन करताना उद्धव आणि आदित्य ठाकरे)
मुंबई- विधानसभा निवडणुकीची तारीख दोन दिवसांवर आली आहे. निवडणुकीच्या प्रचारतोफा आज (सोमवार) सायंकाळी थंडावतील. त्यामुळे पंधरा दिवसांपासून एकमेकांना आव्हान देणारे नेते रविवारी मात्र मतांसाठी राज्यातील जनतेला भावनिक आवाहन करताना दिसले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व मतदानाचे आवाहन केले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भावनिक आवाहन केले तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजिव यांनी चक्क उपस्थित जनतेला दंडवत घालून भावनिक आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावतील. 15 तारखेला मतदान आहे. त्यामुळे नेते, कार्यकर्ते, उमेदवारांना क्षणाचीही उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी नेते अनेक प्रकारचे हातखंडे वापरताना दिसत आहेत. अशाच प्रकारचे एक चित्र मुंबईतील एका सभेत पाहायला मिळाले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजिव आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी (12 ऑक्टोबर) बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये आयोजित सभेत व्यासपीठावर उपस्थित जनतेसमोर दंडवत घालत मते मागितली. उद्धव आणि आदित्य यांना अशा स्थितीत पाहून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
'शिवसेना ही शिवसैनिकाच्या पाठबळावर उभी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेब नेहमी सांगायचे की, ते आणि शिवसैनिकांची आणि शिवसैनिक त्यांची काळजी घ्यायचे. विशेष म्हणजे, 'उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या', या बाळासाहेबांच्या वाक्याची सगळ्यांनी आठवण करून दिली

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये आयोजित उद्धव ठाकरेंच्या सभेची छायाचित्रे...