आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनंत गिते केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार? दिल्लीहून मुंबईसाठी रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची 25 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून चालत आलेली युती संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गिते राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री असलेले अनंत गिते भाजपच्या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीहून मुंबईकडे रावाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गिते केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. मुंबईत दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक झाली होती, त्यानंतरच गिते राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, जागावाटपाची चर्चा चालू आहे, युती तुटणार नाही, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात होते. त्यामुळे त्यांनी तेव्हा राजीनामा दिला नव्हता.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांमध्ये शिवसेनेने सन्मानजनक मंत्रीपदाची मागणी केली होती. एकट्या भाजपकडे लोकसभेत 282 जागा असल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज नव्हती मात्र, गेल्या 25 वर्षांपासूनची युती असल्याचे सांगत शिवसेनेला एक मंत्रीपद देण्यात आले होते. अवजड उद्योग खात्यावर शिवसेना नाराज होती, मात्र तरीही त्यांनी हे खाते स्विकारले होते. आता ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.