आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Minister Nitin Gadkari Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या कारभाराने राज्याला लकवा झाला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा घणाघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बाबा, दादा, आबा यांची राज्यातली नाटक कंपनी बंद करा. त्यांनी राज्याची लूट चालवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारभारामुळे राज्याला लकवा झाला, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. फुलंब्रीचे भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे रविवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पाशा पटेल, श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, जयसिंगराव गायकवाड, ज्ञानोबा मुंडे यांच्यासह उमेदवार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, मधुकर सावंत यांची उपस्थिती होती.
सिंचनाचे पैसे कुठे गेले? :
गडकरी म्हणाले की, सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सिंचन अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी झाले. त्यामुळे हा पैसा गेला कुठे? राज्याची लूट करणारे बाबा, दादा आणि पोपटपंची करणारे आबा हे हजार रुपयांत नाटक करण्याच्या कामाचे आहेत.
शरद पवार कधी कधी खरे बोलतात
पवार कधी कधी खरे बोलतात. मुख्यमंत्र्यांचा हाताला लकवा मारला होता, असे ते खरे बोलले होते. मात्र, केवळ चव्हाणांना नाही, तर आघाडीच्या काळात राज्याच्या कारभाराला लकवा मारला होता, असेही ते म्हणाले.
संजय केणेकरांची समजूत काढली
औरंगाबाद पूर्वमधून भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज संजय केणेकर यांच्या घरी जाऊन नितीन गडकरी यांनी त्यांची समजूत काढली. रविवारी रात्री नऊनंतर ते केणेकरांच्या घरी गेले होते. पूर्वमधून अतुल सावे यांना तिकीट मिळाल्यने केणेकर नाराज झाले होते. काळजी करू नका, पक्षाचे तुमच्याकडे लक्ष आहे, असे ते म्हणाले.