आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने केली राष्ट्रवादीची गोची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आघाडीच्या जागा वाटपासाठी मोठा भाऊ काँग्रेस पुढे येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची बैचेनी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘आम्ही जागावाटपाची लवकरच चर्चा करा, अशी विनंती काँग्रेसला केली, पण त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही निमंत्रणाची वाट पाहात आहोत’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आघाडीच्या संदर्भात आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आतापर्यंत एकदाच बैठक झाली आहे. काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली होती. पण, त्यानंतर अद्याप एकदाही दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते समोरासमोर आलेले नाहीत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी जागा वाटपासंबंधी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, काँग्रेसकडून चर्चेचे पुढचे पाऊल टाकले गेलेले नाही, अशी माहितीही मलिक यांनी दिली.

ओवेसीलाराज्यात लोक नाकारतील
‘एमआयएम’चेअध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसीला महाराष्ट्रातील लोक थारा देणार नाहीत. राज्यात काही ठिकाणी ते पाय पसरत असले तरी पुरोगामी राज्यात कट्टरपंथीयांना लोक साथ देत नाही, असे इतिहास सांगतो. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमदेवारांपुढे काही अडचण येणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. ओवेसीच्या प्रक्षोभक भाषणामुळे मुस्लिबहुल मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.