आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidhansabha Election Campaign In Social Networking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल नेटवर्कींगवरील निवडणूकीचा प्रचार; भासतेय बाळासाहेबांची उणीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बाळासाहेब ठाकरे यांची उणीव शिवसैनिकांना जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी त्यांचे संवाद, भाषणे, विरोधकांवर केलेली टीका-टिपण्णी या बाबी व्हॉट‌्सअ‍ॅप आणि फेसबुकवर शेअर होत आहेत. एका संदेशात तर म्हटले आहे की, ते राजासारखेच राहिले, राजासारखेच जगले. त्यांनी देहात प्राण असेपर्यंत मुंबईवर राज्य केले. त्यांचा दरारा इतका होता की, त्यांच्या निष्प्राण देहानेसुद्धा एक पूर्ण दिवस मुंबई बंद करून दाखविली. त्या मुंबईच्या राजाला मानाचा मुजरा.’ बाळासाहेब आज असते तर..’ या कल्पनेची पत्रेही अ‍ॅपवर फिरत आहेत. त्यात म्हटले आहे, ‘साहेब, ज्या काँग्रेसवर तुमचा राग होता ती कमकुवत झालीये ते पाहण्यास तुम्ही हवे होते.’ युतीत झालेला दुरावा बाळासाहेब असते तर कसा मिटला असता हेदेखील सांगण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात राज-उद्धव यांच्यातील विसंवादाला शिवसैनिक अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे शिळे बटाटेवडेही व्हॉट‌्सअ‍ॅपच्या तव्यावर तापत आहेत. भारतात अंतराळ संशोधनात वाव नाही, असे तरुण मनांना वाटणार नाही. मला त्या दिवसाची अपेक्षा आहे ज्या दिवशी विद्यापीठे यासाठी पुढाकार घेतील.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, गुन्हे दाखल; पण उपाय नाही