लोकसभा निवडणुकीतडंका वाजविल्यानंतर विधानसभेच्या रणांगणातही धुमाकूळ घालायला व्हॉटस् अॅपच्या ग्रुप्सने सुरुवात केली आहे. त्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी
आपापले ग्रुप्स तयार केले असून, त्यावर प्रचार आणि अपप्रचार या दोन्ही आयुधांचा वापर करण्यात येत आहे. पक्षाची भूमिका आणि धोरणे या ग्रुप्सवर पोस्ट केले जात आहेत. त्यानंतर ग्रुपमधील सदस्य अन्य ग्रुप वा व्यक्तींना संबंधित पोस्ट शेअर करतात. या ग्रुप्समध्ये काही पदाधिकारीही असल्याने प्रत्येक सदस्य आपले पक्षप्रेम सिध्द करण्यासाठी पक्षाचा उदो उदो करणाऱ्या कमेंट टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. इतकेच नाही तर विरोधी पक्ष आणि उमेदवारांचा अपप्रचार करण्यासाठीच्या पोस्टही सर्वप्रथम अशाच राजकीय ग्रुप्सवर झळकत आहेत.