नवी दिल्ली - शिवसेना-भाजप युती तोडण्यामागील सूत्रधार म्हणून भाजपाध्यक्ष
अमित शहा यांच्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. तथापि, यामागचे खरे सूत्रधार केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वबळावर भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास गडकरींनी शहा यांना दिल्यानंतरच काडीमोडाची घोषणा झाली.
महायुती अभेद्य राहावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. स्वत: लालकृष्ण अडवाणी,
नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी महाराष्ट्रात युतीचे सरकार यावे यासाठी रणनिती आखत होते. परंतु शिवसेनेचे सूर बदलले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली.