आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anand Sharma News In Marathi, Gujarat Development

केंद्राने गुजरातला नंबर एकचे प्रमाणपत्र दिले नाही : आनंद शर्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‘केंद्र सरकारने पर्यावरण मंजुरी आणि जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणांच्या सोडवणुकीसाठी गुजरात हे देशातील नंबर एकचे राज्य असल्याचे मान्य केले आहे’, हा नरेंद्र मोदी यांचा दावा भ्रामक असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने असे कोणतेही प्रमाणपत्र दिलेले नाही. मोदी आपल्या मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारावर हा दावा करत आहेत मात्र आपल्या मंत्रालयाने असा कोणताच अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. ज्या अहवालाचा दाखला देण्यात येत आहे, तो खासजगी संस्थेचा अहवाल आहे, असे शर्मा म्हणाले.
फक्त दोन बाबींत गुजरात पुढे शर्मा यांच्या मते डीआयपीपीने (वाणिज्य मंत्रालयाची शाखा) अँसेंचर या खासगी आयटी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अहवाल तयार केला आहे. डीआयपीपीने हा अहवाल वेबसाइटवर टाकला आहे. अहवालात एकूण चौदा मुद्यांपैकी दोन मुद्यांवर गुजरातचे कौतुक केले आहे. पण अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरात पिछाडीवर असलेल्या 12 मुद्यांचा मोदींनी उल्लेखच केलेला नाही.

मोदींकडून होत आहे जन्मदात्या आईचीही आबाळ : राशीद अल्वी
काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी आईच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, ‘मोदी आपल्या आईचीही देखभाल करण्यास असर्मथ ठरले आहेत, मग ते देशाची काय काळजी घेणार? मी माझ्या कुवतीप्रमाणे त्यांच्या आईची काळजी घेण्यास तयार आहे.’ मोदींनी आपली संपत्ती कोट्यवधी रुपये असल्याचे घोषित केले आहे पण त्यांच्या आई 90 वर्षांची आहे आणि मतदान करण्यासाठी त्या ऑटोमधून जातात, असे अल्वी म्हणाले. मी चारवेळा गुजरातचा मुख्यमंत्री आहे पण माझी 90 वर्षीय आई आजही ऑटोमधूनच प्रवास करते, असे मोदींनी यापूर्वी सांगितले होते.