आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comparison Between Modi And Vajpayee On 15 Accounts

वाजपेयींपेक्षाही मोठे ठरणार का नरेंद्र मोदी? पाहा दोघांच्या शैलीतील फरक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने घवघवीत यश संपादित केले आहे. केवळ एनडीएच नव्हे तर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. यापूर्वी भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार दिल्लीत सत्तेत आले होते. त्यानंतर नरेंद्र मोदी हे भाजपचे दुसरे नेते आहेत ज्यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. आता या दोन नेत्यांच्या कार्यशैलितील फरक आणि इतर बाबींवर चर्चा सुरू झाली आहे.
मोदी टू-इन-वन
भाजपमध्ये सर्वात मोठे नेते म्हणून ओळख असणा-या वाजपेयी यांची प्रतिमा विकासपुरुष अशी आहे. तर अडवाणी यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. पण मोदी समर्थकांच्या मते मोदी हे टू-इन-वन आहेत. त्यांना मोदींमध्ये विकासपुरुष आणि लोहपुरुष या दोघांचा मिलाप दिसतो. सपाचे माजी नेते आणि आरएलडीकडून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांनी तर मोदींमध्ये अटलजी, अडवाणी आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांची झलक दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा... वाजपेयी आणि मोदींची मुद्देवार तुलना