आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तार्‍यांची धाव वाराणसीकडे; मोठे नेते, अभिनेते, मॉडेल्सनी सांभाळली प्रचाराची धुरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- वाराणसीत जणू सर्व तारे-तारका जमिनीवर अवतरल्याचा भास होत आहे. ते आहेत काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीचे. चित्रपट तारे, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक, मॉडेल्स, राजकारणातील मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि संघटन मंत्री, त्या सर्वांचे सर्मथक हे देशाच्या कानाकोपर्‍यातून येथे पोहोचत आहेत. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्वजणांमुळे हॉटेल्स भरली आहेत. धर्मशाळा, गेस्ट हाऊसमध्ये जागाच नाही. 10 मे रोजी निवडणूक प्रचार संपेपर्यंत जणू असे वाटते, की स्टारमधील युद्ध येथेच रंगणार आहे.

भाजप उमेदवार नरेंद्र मोदी गुरुवारी येथे येत आहेत. 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रथमच. आपचे अरविंद केजरीवाल महिनाभरापासून येथेच मुक्कामी आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार अजय राय स्थानिक आहेत.

प्रचार संपण्यास पाच दिवस बाकी आहेत. हा मतदानाचा अखेरचा टप्पा आहे. केवळ बिहार आणि बंगालमधील काही मतदारसंघ सोडले, तर संपूर्ण देशभरात मतदान झालेले आहे. तेथील सर्व पक्षांचे नेते, उमेदवार, सर्मथक वाराणसीत पोहोचलेले आहेत.

बुधवारी भाजपच्या मुख्यालयात जत्राच भरलेली होती. लोक येत जात होते. दिल्ली विधिमंडळ दलाचे नेते डॉ, हर्षवर्धन, माजी नेते जगदीश मुखी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, मुझफ्फरनगर दंगलीतील मुख्य आरोपी व आमदार सुरेश राणा, गुजरातमधील सर्वच प्रमुख पदाधिकारी, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, अनंत कुमार, परेश रावल आणि अमित शहादेखील. जास्तीत जास्त भाजपवाले हॉटेल, गेस्ट हाऊस, परिचितांच्या घरांमध्ये थांबलेले आहेत. फक्त जेटली, नलिन कोहली आणि अमित शहांसारखे नेते पंचतारांकित हॉटेलांमध्येआहेत. लोकसभा प्रभारी असेलेले अशोक धवन म्हणतात, आम्ही काही जणांना प्रचारासाठी बोलवले होते. येथे मोठय़ा संख्येने लोक स्वत:हून येत आहेत. मोदींवर लोकांचे प्रेमच इतके आहे.

काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, र्शीप्रकाश जयस्वाल, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, गुजरात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोडवाडिया, माजी प्रदेशाध्यक्षा रिता बहुगुणा जोशी, मोहसिना किडवाई, नसीब पठाण, अनिल शास्त्री, रशीद अल्वी, रोड शोसाठी आलेली अभिनेत्री नगमा हे सर्वजण पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तेथूनच ते प्रचारसभांना जातात. प्रदेश कॉँग्रेसचे महासचिव डॉ. सतीश राय म्हणतात, बहुतांश कार्यक्रम केंद्रीय स्तरावरच ठरलेले आहेत, किंवा गुलाम नबीजी यांनी ठरविलेले आहेत. आम्ही फक्त आदेशांचे पालन करत आहोत.

आपतर्फे दिल्लीतील राजीनामा दिलेले पूर्ण मंत्रिमंडळ, त्याबरोबरच आशुतोष, संजय सिंह, संगीतकार विशाल डडलानी, अभिनेता जावेद जाफरी यांच्याबरोबरच देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले कार्यकर्ते, निवडणूक संपलेल्या ठिकाणचे उमेदवार हे सर्वजण आपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरात, धर्मशाळांमध्ये उतलेले आहेत. उद्योगपती एस. पी सिंग यांच्या घरात 15 कार्यकर्ते आहेत.
बंद झाले भाजपचे 13 मजली निवडणूक कार्यालय
ज्या 13 मजली इमारतीतील तीन मजल्यांमध्ये मोदींचे प्रचार कार्यालय उघडण्यात आलेले आहे. त्यात नेत्यांच्या गर्दीमुळे जागा कमी पडत आहे. कोणाला नाश्ता मिळत नाही, तर कोणी झेंडा, बिल्ला मिळत नाही म्हणून परेशान आहेत. जगदीश मुखी यांना भाजपच्या भगव्या टोप्यांचे बंडल तर मिळाले, पण प्रचारपत्रके मिळू शकली नाहीत. काहीशा नरम-गरम स्वरांमध्ये ते म्हणाले, अरे डझनांवारी वेगवेगळी प्रचारपत्रके छापली गेलीत. एखादे तरी असेल? नाहीतर मी येथे आलो कशासाठी?