आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: नितीन गडकरी, गोपिनाथ मुंडे, अनंत गिते यांनी घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7:35PM मोदी सरकारमध्ये कॅबिनेट, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि राज्यमंत्री यांच्या रुपाने 46 खासदारांनी घेतली शपथ.
7:25PM किरण रिजीजू, किशनपाल गुज्जर, संजीव बाल्यान, मनसुख भाई, रावसाहब दानवे, विष्णुदेव साय, सुदर्शन भगत यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ.
7:15PM निर्मला सीतारमन, जीएम सिद्धेश्वरा, मनोज सिन्हा, निहाल चंद, उपेंद्र कुशवाहा, राधाकृष्णन पी. यांनीही घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ.
7:09PM पीयूष गोयल, सर्बानंद सोनवाल, डॉ. जीतेंद्र सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ.
7:00PM संतोष कुमार गंगवार, श्रीपद यशो नाइक, धर्मेंद्र प्रधान, नृपेंद्र मिश्र, सर्वानंद सोनवाल, प्रकाश जावड़ेकर यांनीही घेतली शपथ.
6:50PM स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, व्ही. के. सिंह, इंद्रजीतसिंह यांनी घेतली शपथ.
6:45PM हरसिमरन कौर बादल, जुयल ओराम, राधा मोहन सिंह यांनी घेतली शपथ.
6:40PM अनंत गिते, अशोक गजपती राजू, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, मनेका गांधी, कलराज मिश्र यांनी घेतली शपथ.
6:25PM भाजप नेते गोपिनाथ मुंडे, रामविलास पासवास यांनी घेतली शपथ.
6:25PM नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंदा गौडा, उमा भारती, डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी घेतली शपथ.
6:20PM राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू यांनी घेतली शपथ
6:10PM नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून घेतली शपथ.
6:00PM राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शपथविधी सोहळ्यात दाखल. राष्ट्रगिताने शपथविधी समारंभाला सुरवात.
5:50PM भारताचे नियोजित पंतप्रधान राष्ट्रपती भवनात दाखल. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
5:50PM देश-विदेशातील प्रमुख नेते राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी जरा वेळात गुजरात भवनातून निघतील.
5:45PM कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहनसिंग, शरद पवार, प्रफुल्ल पटेल राष्ट्रपती भवनात दाखल.
5:40PM पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ राष्ट्रपती भवनात दाखल.
5:25PM माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम राष्ट्रपती भवनात दाखल.
5:22PM मंत्रीपद न मिळाल्याची नाराजी झटकत मुरली मनोहर जोशी राष्ट्रपती भवनात दाखल.
5:20PM शरद पवार, प्रफुल्ल पटेल शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल
5:15PM अंबानी तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू शपथविधी समारंभात उपस्थित.
5:10PM अंबानी उद्योग समुहाचे मुकेश अंबानी, निता अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी राष्ट्रपती भवनात उपस्थित.
5:00PM राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आरएसएस प्रवक्ते राम माधव यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
4:45PM Narendra Modi ‏@narendramodi A big thank you to all friends who will be viewing the ceremony on TV and through social media. Your constant support & blessings mean a lot
4:40PM शपथविधी समारंभ 5.30 वाजता राष्ट्रपती भवनात सुरवात होणार.
4:30PM महाराष्ट्रातील खासदार, नेत्यांची विशेष बस लवकरच राष्ट्रपती भवनात पोहोचणार. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून बस रवाना.
4:15PM मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवले यांची नाराजी.
4:15PM हृतिक रोशन आणि राकेश रोशन दिल्लीला पोहोचले. शपथविधीला उपस्थित राहणार.
4:00PM नरेंद्र मोदी गुजरात भवनातून सायंकाळी 5:45 वाजता राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी निघतील.
3:50PM मोदींच्या शपथविधीनंतर जलपान-भोजनाचा कार्य़क्रम. जेवणात गलौटी कबाब, कडी, दाळ मखनी, संदेश, चिल्ड मेलन सूप, चिकण हजारवी, तंदूरी आलू, अरबी कबाब, बीरबली कोफ्ता, जयपुरी भेंडी, बासमती राईस, पोळी, पापड, श्रीखंड, पाइन अॅपल हलवा, ग्रीन टी आणि साऊथ इंडियन कॉफी सर्व्ह केली जाणार आहे.
3:45PM आदी गोदरेज म्हणाले, की अर्थ आणि कार्पोरेट अफेअर्स मंत्रालय एकत्र करण्याचा निर्णय योग्य. दोन्ही जबाबदाऱ्या अरुण जेटली समर्थपणे सांभाळू शकतील.
3:35PM स्मृती इराणी म्हणाल्या, की मोदींनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासावर पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करणार.
3:25PM कॉंंग्रेस नेते राजीव शुक्ला उपरोधक टोला लगावताना म्हणाले, की आता चांगले दिवस लवकरच येणार आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. महागाई आटोक्यात येणार आहे. दहशतवादी कमी होणार आहे.
3:12PM नवाझ शरीफ म्हणाले, की 1999 मध्ये वाजपेयी आणि माझी चर्चा झाली होती. तेथूनच आम्हाला सुरवात करायची आहे. दोन्ही देशांमध्ये असुरक्षितता आणि अस्थिरतेचे वातावरण मागे टाकण्याची वेळ आली आहे.
3:10PM गोरखधाम एक्सप्रेस दुर्घटनेवर नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.
3:00PM भारतात आल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, की हा महान क्षण आणि शानदार संधी आहे. यावेळी दोन्ही देशांच्या लोकांनी एकत्र यावे.
2:50PM मनमोहनसिंग यांची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेणार.
2:40PM शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेणार. खरे तर मनमोहनसिंग यांनी मोदींची भेट घ्यायला हवी. परंतु, त्यांच्या वयाचा मान राखत मोदींनी हा नवा पायंडा पाडला आहे.
2:25PM सलिम खान, सलमान खान, सोहेल खान दिल्लीला पोहोचले. मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार.
2:20PM कार्पोरेट प्रकरणांची अतिरिक्त जबाबदारीही अरुण जेटली यांना मिळण्याची शक्यता.
2:17PM अरुण जेटली यांना अर्थमंत्रालयासह संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त चार्ज मिळण्याची शक्यता.
2:15PM नरेंद्र मोदी यांच्यानंतर अरुण जेटली असणार सरकारमध्ये नंबर टू.
2:10PM मालदिवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचे दिल्लीला आगमन.
2:00PM नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसैन शरीफ म्हणाला, की नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला खूप आशा आहेत. त्यावर ते खरे उतरतील अशी अपेक्षा आहे.
1:56PM पाकिस्तानचे पीएम नवाझ शरीफ मुलासोबत भारत दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानातून आलेले पाहुणे दिल्लीच्या ताज मान सिंह हॉटेलमध्ये थांबले आहेत.
1:53PM दिल्लीच्या आयजीआय एयरपोर्टवर खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, की जनतेला मोदींकडून खूप आशा आहेत.
1:46PM आरएसएसचे प्रवक्ता राम माधव म्हणाले, मोदींच्या शपथविधीला सार्क देशाच्या प्रतिनिधींनी येणे महत्त्वाचे.
1:41PM Narendra Modi ‏@narendramodi My condolences to families of those who lost their lives in the Gorakhdham express tragedy. Prayers with the injured.
1:41PM Narendra Modi ‏@narendramodi Spoke to the Cabinet Secretary. Asked him to take an overview of the situation & ensure timely assistance to those injured.
1:38PM कॅबिनेट सेक्रेटरी अजीत सेठ यांनी गोरखधाम एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेची माहिती घेतली.
1:37PM उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार
1:30PM शिव शंकर मेनन यांच्या जागी अजीत डोभाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होऊ शकतात.
1:29PM पश्चिम बंगाल सरकारकडून अमित मित्रा शपथविधी समारोहात.
1:29PM शिवसेना नेते अनंत गिते यांना कॅबिनेटमंत्री पद. यांची माहिती त्यांनी स्वतः दिली.
1:29PM एमएडीएमके प्रमुख वायको यांना अटक झाली.
1:29PM पाकिस्तानच्या वागणुकीत बदल झाला नाही तर नरेंद्र मोदी यांना अणू हल्ला करावा लागेल, म्हणाले उद्धव ठाकरे.
1:29PM बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

1:11PM Yes I am the sole minister from Shiv Sena in the cabinet,more will be inducted after cabinet expansion in a month-Anant Geete,Shiv Sena
1:09PM Yes I am the sole minister from Shiv Sena in the cabinet,more will be inducted after cabinet expansion in a month-Anant Geete,Shiv Sena- source ANI
1:05PM रजनीकांत याची पत्नी लता शपथविधीला उपस्थित राहणार.
1:03PM ShivrajSingh Chouhan ‏@ChouhanShivraj India shall attain unprecedented heights under the able leadership of @narendramodi. Heartiest wishes to the Leader and my countrymen.
12:45PM सलीम खान आणि सोहेल खान शपथविधीत उपस्थित राहणार. दिल्लीला रवाना.
12:38PM 23 खासदारांना कॅबिनेट मिनिस्टर, 10 ला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 11 खासदारांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली जाईल.
12:23PM Formal announcements of cabinet ministers will be made later,me and other probables met Modiji-Kiran Rijiju,BJP
12:10PM जोएल ओरांव, राधामोहन सिंह, नरेंद्रसिंह तोमर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता.
12:01PM रामदेव बाबा, रजनिकांत मोदींच्या शपथविधीला येणार नाहीत. राजस्थानमधून मंत्रिमंडळात कोणीही नाही.
11:10AM नवाझ शरीफ यांचे भारतात आगमन.
11:04AM विदेशातील प्रमुख पाहुणे म्हणून भुतान, मॉरिशसचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे, बांगलादेशाचे संसदेचे सभापती भारतात येणार.
11:02AM एमडीएमकेचे नेते वायको यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांचे श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शने.
10:53AM भाजप नेता नजमा हेपतुल्ला यांनी मोदींची भेट घेतल्यावर म्हणाल्या, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेल.
10:46AM पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विमानाने उड्डाण केले.
10:46AM राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार.
10:43AM अमिताभ बच्चन, रेखा, रजनिकांत शपथविधीला उपस्थित राहणार.
10:42AM आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र नरेंद्र मोदींचे प्रधान सचिन राहण्याची शक्यता.
10:41AM मोदींची भेट झाल्यावर उपेंद्र कुशवाहा म्हणाले, सायंकाळपर्यंत वाट बघा.
10:39AM दिल्लीसाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, की पाकिस्तानातून भारतासाठी मैत्रीचा संदेश घेऊन आलोय.
10:18AM संभाव्य मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरात भवनात चहा घेतला. मुरली मनोहर जोशी गुजरात भवनात आले नाही.
10:17AM मोदी सरकारमध्ये 18 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्री आज शपथ घेणार. राष्ट्रपतींना सादर केली यादी.
10:11AM श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे दिल्लीती पोहोचले.
9:49AM मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम दिल्लीला पोहोचले.
9:45AM अमित शहा कॅबिनेट मंत्री नसतील.
9:18AM मोदी म्हणाले, की माझ्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रालयांचे विलिनिकरण करण्यात येतील. यामुळे मंत्रालयांमध्ये समन्वय राखणे सोईचे जाईल.
9:18AM नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाण्यापूर्वी ट्विट केले. मोदी म्हणाले, की मिनिमम गर्व्हंमेंट, मॅक्सिमम गव्हर्नंन्स या संकल्पाला लक्षात ठेवून मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
9:00AM मनसुख वसावा, स्मृति इराणी, नरेंद्र तोमर, कलराज मिश्रा, अनुराग ठाकुर, एस एस अहलुवालिया, किरीट सोमय्या, दिलीप गांधी, पीयूष गोयल, महबूब अली केसर, सत्‍यपालसिंह, जनरल व्ही के सिंह, राजबीर सिंह यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता.
8:59AM राजनाथसिंह, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, नि‍तिन गडकरी, रविशंकर प्रसाद, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, थावर चंद गहलोत, सुमित्रा महाजन, शांता कुमार, मेनका गांधी, मुख्‍तार अब्‍बास नकवी, संतोष गंगवार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता.
8:50AM नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांची नावे पक्की झाली.
8:50AM नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार
8:37AM चाणक्यपुरी येथील गुजरात भवनात गेले.
8:35AM नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली.