आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 मध्ये मोदी तर 2026 मध्ये राहुल यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- 16 लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अखेरचा टप्पा सुरू असताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची दिवसंदिवस क्रेज वाढताना दिसत आहे. अनेक निवडणूक सर्व्हेमध्ये मोदींच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही मोदींचे ग्रह-नक्षत्रदेखील यंदाच्या निवडणुकीत त्यांचेत वर्चस्व राहणार असल्याचे सांगत आहेत. देशातील अनेक ज्योतिष पंडितांनी मोदी हेच देशाचे भावी पंतप्रधान असतील, अशी भविष्यवाणी केली आहे.

जयपूर येथील विख्यात ज्योतिष सुरभी गुप्ता यांच्या मते, 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनतील. सुरभी गुप्ता या नाव आणि स्वाक्षरीच्या आधारावर ही भविष्यवाणी केली आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र 2026 पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सुरभी गुप्ता यांनी सांगिले आहे.

सुरभी गुप्ता नुकत्याच सुरत येथे आल्या होत्या. सुरभी म्हणाल्या, मोदींच्या अंकगणिताच्या आधारानुसार त्यांचे ग्रह लाभाच्या स्थितीत आहेत. ग्रहांचे पाठबळ लाभलेल्या मोदींना पंतप्रधान बनण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही. 2015 मध्ये मोदींना प्रकृतीबाबत काही समस्या निर्माण होवू शकतात, असेही सुरभी यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मोदी आणि राहुल गांधींबाबत काय म्हणाल्या सुरभी...