आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Atal Bihari Bajpai Text Book News In Marathi

'मोदी लाट' थेट पाठ्यपुस्तकापर्यंत, मोदींसह वाजपेयींचा अभ्यासक्रमात होणार समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधानपदापासून अद्याप बरेच दूर आहेत. ते पंतप्रधान बनणारच असे गृहित धरूनच त्यांच्या निकटवर्तीयांनी तयारी सुरू केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नरेंद्र मोदींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश.
राजस्थानचे शिक्षणमंत्री कालीचरण सराफ यांनी अशा प्रकारची योजना आखली आहे. मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होताच, ते ही योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचे सराफ म्हणाले.

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांसारख्या काँग्रेस नेत्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो, तर त्यांच्याप्रमाणेच इतर पात्र नेत्यांचाही समावेश केला जाऊ शकतो, असे स्पष्टीकरणही कालीचरण सराफ यांनी दिले आहे. अटलजींनी केलेले कार्य अतुलनीय होते, पण केवळ ते काँग्रेसमध्ये नसल्यामुळे त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी पत्रकारांबरोबर बोलताना केला. त्याचप्रमाणे मोदी यांनी जीवनात मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला आहे. त्यांचे जीवनचरित्र हे विद्यर्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार असल्याचे सराफ यांनी सांगितले.

...मग दंगलीचाही समावेश करा
काँग्रेसने या मुद्यावरून सराफ यांच्यावर टीका केली आहे. भाजप जेव्हाही सत्तेत आली, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, असे काँग्रेसच्या राजस्थानच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी म्हटले आहे. भाजपने २००२ मध्ये झालेल्या दंगलींचा समावेशही अभ्यासक्रमात करावा, अशा टोलाही त्यांनी लगावला.