आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Denied Permission For Events In Varanasi City Limits News In Marathi

मोदींसाठी वाराणसीत उद्या अरुण जेटली, अमित शहा धरणे आंदोलन करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि अमित शहा उद्या बनारस हिंदू विद्यापिठासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. निवडणूक अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी जेटली यांनी केली आहे.
यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अरुण जेटली म्हणाले, की पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला त्याच्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी परवानगी मिळत नाही, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. वाराणसीतील निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी निवडणूक आय़ोग सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात तीन राजकीय कार्यक्रम घेण्याची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अखेर परवानगी मिळालीच नाही. त्यामुळे मोदींच्या कार्यक्रमांना मुद्दाम परवानगी देण्यात आलेली नाही, असा आरोप भाजपने केला आहे.
वाराणसी मतदारसंघातील ग्रामिण भागात आयोजित करण्यात आलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शहराच्या परिसरात त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. गंगा आरती, शहरातील 150 नामांकीत लोकांना भेटणे आणि रॅली काढणे या तीन कार्यक्रमांना वाराणसीतील निवडणूक अधिकाऱ्याने परवानगी दिलेली नाही.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. मिस्टर खान यांना राष्ट्रीय ध्वज लावण्याची परवानगी दिली असल्यानेही मोदींना परवानगी नाकारल्याचे सांगितले आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना मार्च महिन्यात गंगा आरती करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
याबाबत अरुण जेटली यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल रॅली काढली होती. तिची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर.....