आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Lived In Small Room Of Dholka Village

EXCLUSIVE: आणीबाणीत जेथे 3 वर्षे लपले होते मोदी तेथे आज आहे शिवमंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोलका (गुजरात) - केवळ देशातच नव्हे तर जगभरात आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित अशा विविध घटनाही प्रकाशझोतात येत आहेत. तरीही अजूनही मोदींबाबत अशा ब-याच बाबी आहेत, ज्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता त्यांचा हा प्रवास 1995 मध्ये सुरू झाला अशी माहिती समोर येत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही.
मोदी यांचा राजकीय चळवळीत फार आधी प्रवेश झाला होता. 1975 ते 77 पर्यंत ते भूमिगत होते. या दरम्यानही ते आरएसएस कार्यकर्त्यांच्या रुपाने सक्रिय होते. वेश बदलून ते संघाचा प्रचार करत होते. गांधीनगर येथील कोट्यवधींच्या हायटेकमध्ये बसणारे मोदी तीन वर्षे एका लहानशा खोलीमध्ये अनेक समस्यांचा सामना करत काढले होते, हे ऐकूण कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. याकाळात मोदी धोलका गावात राहत होते. ते ज्या खोलीत रहायचे तेथे आज एक शिवमंदिर तयार झाले आहे.

पुढच्या स्लाईडमध्ये वाचा मोदींचा रंजक प्रवास...